spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ची हवा! परंतु ‘गांधी गोडसे एक युद्ध’ जोरदार आपटला

बॉलीवूडच्या किंग खानचे (Bollywood king khan) फॅन्स त्याच्या चित्रपटाची नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. पठाण (Pathaan) या चित्रपटाचे नाव जेव्हा चर्चेत होते तेव्हापासून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत होते. बॉलीवूड किंग खानचा चित्रपट पठाण हा आता सिनेमा घरात भेटीला आला आहे आणि दुसरीकडे राजकुमारी यांचा गांधी आणि गोडसे हा सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे दोन्ही सिनेमे आमने सामने आहेत. पठाण आणि गांधी गोडसे एक युद्ध (Gandhi Godse Ek Yudh) हे दोन्ही हि सिनेमे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याने ४ वर्षांनी कमबॅक केले आहे. तर दुसरीकडे सिनेमाच्या माध्यमातून राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांनी पुन्हा एकदा ९ वर्षांनी सिनेमा सृष्टीत पाऊल ठेवले आहे.

राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला गांधी गोडसे एक युद्ध हा सिनेमा २६ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता तेव्हा त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पण तरीही या चित्रपटाचं राजकुमार संतोषी यांनी प्रमोशन केले. या सिनेमामध्ये दीपक अंतानी आणि चिन्मय मांडलेकर (Deepak Antani and Chinmoy Mandalakar) हे कलाकार मुख भूमिकेत आहेत. या सिनेमाची निर्मिती ४५ कोटी च्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. पण पहिल्याच दिवशी हा सिनेमा हवी तशी जादू सिनेमा घरांमध्ये दाखवण्यात चुकला आहे.

पठाण हा सिनेमा रिलिज होण्याआधी वेड हा सिनेमा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत होता. वेड (Ved) हा सिनेमा अभेनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याचा पहिला दिग्दर्शन केलाला सिनेमा होता. वेड या चित्रपटाच्या रिलिजच्या दुसऱ्या आठवड्यात वेड या सिनेमाने ५० कोटींची कमाई केली होती. अनेक रेकॉर्ड आपल्या नावांवर केले होते. तसेच मराठी सिनेमा सैराटचा सुद्धा रेकॉर्ड मोडणार अशी शक्यता वर्वतली जात होती. वाळवी सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीला आला होता. पण पठाणच्या रिलिजनंतर या सिनेमाला सुद्धा मोठा फटका बसला होता. अनेक थिएटर्सने या सिनेमाचे शो सुद्धा काढून टाकले आहेत. किंग खानच्या फॅन्सचा चांगलाच क्रेझ आहे. पठाण सिनेमा पाहण्यासाठी किंग खानचे फॅन्स सिनेमा गृहात पुन्हा पुन्हा जात आहेत. रिलिज च्या पहिल्या दिवशी ५७ कोटीची कामे या चित्रपटाने केली आणि दुसऱ्या दिवशी ६५ कोटीची कमाई केली. अश्या प्रकारे दोन दिवसात या चित्रपटाने १२० कोटीची कामे करून सिनेमा गुहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. आणि शाहरुक खान हा बॉक्स ऑफिसचा बादशाह आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले.

हे ही वाचा:

Jacqueline Fernandez ला कोर्टाकडून मोठा दिलासा

Pathaan Housefull, शाहरुख खानचा पठाण काश्मिरमध्ये करतोय जादू

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss