spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजपा आणि शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता, ‘या’ सर्वेक्षणात आली महत्वाची माहिती

सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलाच तापल्याच दिसून येत आहे. तर इंडिया टुडे आणि ‘सी-वोटर’ (India Today and C-Voter) यांनी संयुक्त विद्यमाने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्व्हेक्षणात महत्वाची माहिती समोर आली आहे. या सर्व्हेक्षणात एनडीए सरकारच्या कामगिरीबाबत देशातील जनतेचा सध्याचा कौल कुणाच्या बाजूनं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण आता सहा महिन्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नेमके कितव्या स्थानी आहेत आणि त्यांना राज्यातील जनता किती पसंती देते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने स्वीकारलंय का? असा सवालच India Today-C Voter ने केलेल्या सर्व्हेमध्ये विचारण्यात आला.

या सर्वेक्षणातून कोणाला मोठा धक्का बसणार आहे असं सांगण्यात आलं आहे. लोकसभेच्या आता निवडणूका झाल्यास महाराष्ट्राचा विचार केल्यास या सर्व्हेक्षणातून भाजपा आणि शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. तर तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला भरघोस यश मिळू शकेल, असे या सर्वेक्षणातून समोर येत आहे. त्यामुळे हा सर्व्हे एनडीएसाठी म्हणजेच भाजपा आणि शिंदे गटला मोठा धक्का ठरू शकतो. पंतप्रधानपदी कुणाला पाहायला आवडेल यावर आजही जनतेनं नरेंद्र मोदींवर सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नावाला ५२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर १४ टक्के राहुल गांधी (Rahul Gandhi), ५ टक्के अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि ३ टक्के लोकांनी अमित शाह (Amit Shah) यांचं नाव घेतलं आहे.

जेव्हा आपण फक्त महाराष्ट्रातील जनतेला हा प्रश्न विचारला की, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये शिंदे हे कितव्या स्थानी असावेत. तर त्यात टॉप १० लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे हे दिसून आलेले नाहीत. म्हणजेच सर्व्हेनुसार, अद्याप तरी मुख्यमंत्री शिंदे हे फारसे लोकप्रिय नाहीत. आता या सगळ्या सर्व्हेचा भाजप आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कसा विचार करतं आणि निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

Billionaires list जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा फेरबदल, गौतम अदानी घसरले सातव्या क्रमांकावर

नाशकात ठाकरे गटाने दिला भाजपाला मोठा धक्का

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss