spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दात दुखीच्या समस्येपासून आहेत त्रस्त तर अश्या प्रकारे घ्या काळजी

सुंदर दात हे तुमच्या हसण्याचे सौंदर्य असते. ज्यांचे दात मोत्यासारखे सुंदर दिसतात तर तो चारचौघांमध्ये दिलखुलासपणे हसू शकतो. काही लोकांना दात पुढे असण्याचा, वाकडे असल्यामुळे न्यूनगंड येतो. एवढेच नाही तर दातांना होणारी वेदना ही अत्यंत दाहक असते.

सुंदर दात हे तुमच्या हसण्याचे सौंदर्य असते. ज्यांचे दात मोत्यासारखे सुंदर दिसतात तर तो चारचौघांमध्ये दिलखुलासपणे हसू शकतो. काही लोकांना दात पुढे असण्याचा, वाकडे असल्यामुळे न्यूनगंड येतो. एवढेच नाही तर दातांना होणारी वेदना ही अत्यंत दाहक असते. यामुळे संपूर्ण शरीराला त्रास होतो त्यामुळे मोत्यांसारख्या तुमच्या सुंदर दातांची आपण योग्य पद्धतीने निगा घेतली पाहिजे. जर दातांची निगा योग्य प्रकारे राखली नाही तर आपण दूर्लक्ष केले तर दातांवर काळे डाग पडून त्यास किड लागू शकते व जेवण करताना दात दुखत असतील किंवा चावण्यास त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळेतच त्यावर उपचार करा. आणि दातांची काळजी घ्या.

जेवल्यानंतर किंवा रात्री झोपताना दातांना चांगले स्वच्छ केले पाहिजे. दातांना योग्य वेळी जर स्वच्छ केले नाही तर जिंजीवाइटिस, पीरियोडेंटिस सारख्या दातांच्या समस्यांना (Dental problems) तोंड द्यावे लागते. जिंजीवाइटिस या संसेमध्ये हिरड्यांचे सूज येते व दात दुखतात , जिंजीवाइटिसवर(Gingivitis) योग्य उपचार जर झाला नाही तर पीरियोडेंटिस (periodontis) सारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागेल. हिरड्या व दात यांच्याशी जोडलेला जो भाग असतो तो नष्ट करण्याचे काम पीरियोडेंटिसचे कीटककरतात त्यामुळे दात खिळखिळे होतात व काही कालांतराने पडतात.

  • दिवसातून दोन वेळा जेवल्यानंतर व रात्री झोपताना दात स्वच्छ करावे. यासाठी चांगला टूथब्रश वापरला पाहिजे. तीन ते चार महिन्यानंतर टूथब्रश (Toothbrush)बदलला पाहिजे कारण काही काळानंतर तो खराब होतो व ब्रश करताना हिरड्यांना इजा होते.
  • दात योग्य पद्धतीने स्वच्छ केले पाहिजेत. दात घासताना सर्व दात नीट घासले जातायत की नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. व चांगली टूथपेस्ट वापरली पाहिजे घासले.

  • टूथपेस्ट (Toothpaste) ने देखील दात स्वच्छ होत नसतील तर फ्लोराइड दंत मंजन वापरले पाहिजे.
  • जेवणानंतर पाण्याची गुळणी करून दात स्वच्छ केले पाहिजे. त्यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण निघून जातात.व दात किडण्याच्या समस्येपासून आपण दूर राहतो.
  • जिंजीवाइटिसच्या आजारापासून बचावासाठी ‘क’ व ‘ड’ जीवनसत्त्व तसेच लवंगाचे तेल यांचा वापर केला पाहिजे.

Latest Posts

Don't Miss