spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वीजबिल आणि भाडं न भरल्याने ठाकरे गटावर आली नामुष्की

सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. ६ महिन्यांपूर्वी शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडली आणि दोन गट निर्माण झाले. तर नागपुरात (Nagpur) शिवसेना उद्धव ठाकरे गटावर (Shiv Sena Uddhav Thackeray group) पक्ष कार्यालय रिकामं करण्याची वेळ आली आहे. वर्षभराचे भाडे आणि वीज बिल न भरल्याने गणेशपेठ येथील कार्यालय सोडण्याची वेळ आली आहे.

शिवसेना कोणाची असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणावर शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेने दावा (claim) केला आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. शिंदे सेनेने खासदार, आमदारांसह शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुद्धा पळवले आहेत. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार गेल्यापासून उद्धव ठाकरे सक्रिय झाले आहेत. सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना त्यांनी मुंबईत बोलावून बैठका घेतल्या.

भाजप आणि शिंदे सेनेसोबत दोन हात करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विदर्भाचे दोन दौरे केले. काही दिवस ते मुक्कामीसुद्धा होते. भाजपसाठी जागा सोडल्या ही आमची चूक झाल्याचे मान्य करून विदर्भात सेनेला पुन्हा बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. या दरम्यान शिवसेनेच्या बैठका शिवसेनाभवना (Shiv Sena Bhavan) ऐवजी नागपूरचे संपर्क नेते दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यालयात होत असल्याने अनेकांनी आक्षेपसुद्धा नोंदवला होता. मुंबईपर्यंत याच्या तक्रारी काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. याची दखल घेऊन पक्षसंघटनेची बैठक शिवसेना भवनातच घ्यावी असे आदेशही मुंबईच्या नेत्यांनी दिले होते. मात्र याची दखल कोणी घेतली नाही. आता तर शिवसेनेचे कार्यालयाच अस्तित्वात राहिले नाही.

हे ही वाचा:

अभिनेत्री रकूल प्रीतने शेअर केले तिच्या नवीन लुकचे खास फोटो

पठाण चित्रपटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss