बॉलीवूडची पंगाक्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) ही कोणत्या न कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असते. कोरोनाच्या काळात तर तिने ट्विटर (Twitter) वर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ट्विटरने तिला बॅन केले होते. कंगना रणौत हीने आता पुन्हा ट्विटरवर कमबॅक केलं आहे. शाहरुख खानचा पठाण चित्रपट (Movie) हा भेटीला आला असून सिनेमा गृहामध्ये रेकॉर्ड ब्रेक (Record Break) कामे करत आहे. कंगणा रणौत ट्विटरवर परतली आहे. तर ती सलग ट्विटरवर ट्विट करत आहे. आता पुन्हा ती बॉलीवूडवर निशाणा साधत आहे. आलिया भट्टपासून करण जौहरपर्यंत सर्वच सेलिब्रेटी पठाण सिनेमाचे कौतुक करत आहेत. परंतु कंगना आता बॉलीवूड सेलिब्रेटीवर निशाणा साधत आहे. कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “बोललीवूडकरांनो द्वेषावर विजय” असं जर मी पुहा केलं तर मला तुम्ही शाळा घ्यायला लागेल. तुम्ही तुमचं काम चांगलं करा आणि तुमच्या यशाचा आनंद घ्या आणि राजकारणातून दूर व्हा.
कंगनाचा धाकड (Dhakad) सिनेमा हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप (Flop) झाला होता. यावर एका ट्विटर युजरने लिहिलं होत “कंगना जी. ‘धाकड’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त ५५ लाखांची कमाई केली होती. या धाकड सिनेमाने २.५८ कोटीची कामे केली होती. दुसरीकडे शाहरुखच्या पठाणने रिलीजच्या पहिल्याच दिवशी १०० कोटींची कामे केली आहे. निराशा तर झालीच असेल. कंगनाने त्या ट्विटर युजरला उत्तर देत म्हणाली “मला मान्य आहे कि धाकड सिनेमा फ्लॉप ठरला. पण शाहरुख खानचा गेल्या दहा वर्षात सुपरहिट होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. हि गोष्टी आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. भारतीय सिनेमा रसिकांनी आज शाहरुखला पाठिंबा दिला आहे. भारत महान आहे जय श्री राम” असे ती म्हणाली. कंगना रणौत याआधी पंथांच्या यशाबद्दल बोलताना म्हणाली होती, “पठाण हा सिनेमा चांगला आहे अश्या पद्धतीने सिनेमे चालावे. असे सिनेमा बनवले तर बॉलीवूड इंडस्ट्री पुन्हा एकदा बहरेल.
हे ही वाचा:
पठाण चित्रपटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया