spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईत आज मोर्च्यांचा रविवार, शिवाजी पार्क आणि आझाद मैदानात होणार ‘जन आक्रोश’

हे. त्यामुळे आज मुंबईतले वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. एक मोर्चा हा दादरच्या शिवाजी पार्क येथे सुरु होणार आहे.

मुंबईत आज रविवारी दोन ठिकाणी दोन मोठ्या मोर्च्यांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज मुंबईतले वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. एक मोर्चा हा दादरच्या शिवाजी पार्क येथे सुरु होणार आहे आणि कामगार मैदानावर पार पडणार आहे. तर दुसरा मोर्चा हा लिंगायत समाजाचा असणार आहे.यामध्ये लिंगायत समाजाच्या वेगवेळ्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हा मोर्चा असणार आहे. लिंगायत समाजाचा मोर्चा हा आझाद मैदानावरुन निघणार आहे. लव्ह जिहाद ते लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी हे मोर्चे काढण्यात येणार आहे.

देशातील वाढती लव्ह जिहादची प्रकरणं पाहता हे असले प्रकार रोखण्यात यावेत आणि धर्मांतर कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा म्हणून आज हिंदू समाजामार्फत मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. दादर येथील शिवाजी पार्कमधून मोर्च्याची सुरुवात झाली आहे आणि चित्रा वाघ, आशिष शेलार, किरीट सोमय्या यांसारख्या भाजपच्या बड्या नेत्यांनी देखील हजेरी लावली आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कामगार मैदान परिसरात पोलिसांचा पॉईंट टू पॉईंट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काय आहेत मागण्या?

देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकरच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताब याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी.
लव्ह जिहाद विरोधी कायद्याची अंमलबजावणी व्हावी.
देशात तसेच महाराष्ट्रात लवकरात लवकर धर्मांतरण कायदा लागू व्हावा.

लिंगायत समाजाचा महामोर्चा

लिंगायत समाज देखील आज त्याच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात महामोर्चा काढणार आहेत.या मोर्चामध्ये धर्मगुरूंसह लिंगायत समाजातील नेते मंडळी सहभाग होणार आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातील दहा हजार लिंगायत समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. आझाद मैदानावर लिंगायत मोर्च्याला हळू हळू गर्दी जमा होताना दिसत आहे. तसेच या मोर्चात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व तेलंगणा राज्यातील समाजबांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

लिंगायत समाजाच्या मागण्या कोणत्या?

  • इतर धर्मांप्रमाणे लिंगायत समजाला देखील संवैधानिक मान्यता देण्यात यावी.
  • राज्यात जितकेही लिगायत धर्मीय आहेत त्यांना अल्पसंख्यांकांचा दर्जा जाहीर करावा.
  • सोलापूर जिल्ह्यातील महात्मा बसवेश्वर यांच्या मंजूर झालेल्या पुतळ्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे.
  • महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा मुंबईतील विधानभवन परिसरात उभारण्यात यावा.
  • महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.
  • गाव तेथे रुद्रभुमी ( स्मशानभुमी) आणि गाव तेथे अनुभव मंटप ( सभामंडप ) करण्यात यावे.
  • लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह निर्माण करण्यात यावे.
  • राष्ट्रीय जनगणनेत लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम देण्यात यावा.

हे ही वाचा:

आईच्या निधनामुळे Rakhi Sawant वर कोसळला दुःखाचा डोंगर, कॅन्सर आणि ब्रेन ट्युमरने होत्या ग्रस्त

केंद्रीय मंत्र्यांना स्वत:च्या खात्याचा अर्थ कळत नाही, विनायक राऊतांनी लगावला नारायण राणेंना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss