spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राहुल गांधींची चीनच्या राजदूताबरोबर बैठक… , एस जयशंकर यांनी केला चिनी घुसखोरीवर मोठा खुलासा

चीन हा देश गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या सीमावाढ धोरणामुळे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. या मुद्द्यांवर भारतात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु असतात. तर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काही दिवसांपासून चीनच्या घुसखोरीवरून सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करताना आढळले आहे. तर अलीकडेच अरुणाचल प्रदेशातील तवांग भागातील यांगत्से सीमाभागात चिनी सैनिक आणि भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर आली होती. यावर केंद्र सरकारचं चीन धोरण पूर्णपणे चुकलं आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल होत. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी चिनी घुसखोरीवर एक मोठा खुलासा करत राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

अलीकडेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळेस एस जयशंकर यांना भारतीय जमिनीवर चीनने केलेल्या घुसखोरीवर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा एस जयशंकर यांनी सांगितले की , “चीनने भारताच्या जमिनीवर १९६२ सालीच घुसखोरी केली होती. हे विरोधी पक्षातील लोक सांगणार नाही. जसे की चीनने अलीकडेच भारताच्या जमिनीवर कब्जा केला आहे, असं विरोधी पक्षाकडून दाखवले जात आहे.” तर एस जयशंकर यांनी पुढे सांगितल की ” २०१७ साली भारत आणि चीन सीमेवर तणाव निर्माण झाला होता. तेव्हा राहुल गांधींची चीनच्या राजदूताबरोबर बैठक झाल्याचं समोर आलं होतं.” असे म्हणत एस जयशंकर यांनी भारत आणि चीन सीमावादावर मोठा खुलासा केला आहे. यावर ते पुढे म्हणाले की “जर मला चीनबद्दल काह जाणून घ्यायचं झालं, तर चीनच्या राजदूताकडे जाणार नाही. माझ्या देशातील लष्कर प्रमुखाकडे जाणार,” असं म्हणत एस जयशंकर यांनी राहूल गांधी यांना टोला लगावला आहे.

अरुणाचल प्रदेशातील तवांग भागातील यांगत्से सीमाभागात चिनी सैनिक आणि भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये डिसेंबर महिन्यात झटापट झाली होती. यात दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले होते. या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधीं यांनी विधान केले होते की .” “केंद्र सरकारचं चीन धोरण पूर्णपणे चुकलं आहे. सरकारकडून लष्कराच्या मागे लपून स्वत:च्या बचावाचा प्रयत्न होत आहे. पण, सीमेवर काय घडलं ते सर्वांना सांगा. मी सरकारबद्दल काही भाष्य केलं, तर लष्कराविरोधात बोललो असल्याचं सांगत दिशाभूल करण्यात येते,” असे राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केल होता.

हे ही वाचा:

केंद्रीय मंत्र्यांना स्वत:च्या खात्याचा अर्थ कळत नाही, विनायक राऊतांनी लगावला नारायण राणेंना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss