spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजप आणि शिंदेगटाच्या नेत्यांचा जन आक्रोश, महामोर्च्यसाठी पहिल्यांदाच येणार एकत्र

लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, धर्मांतर विरोधी कायदा लागू करा आणि श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा द्या हे ह्या मोर्च्यातील प्रमुख मुद्दे आहे.

हिंदूंच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आज मुंबईत सकल हिंदू समाजाकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कपासून सुरु झालेलय ह्या मोर्च्याची सांगता परळच्या कामगार मैदानावर होणार आहे. हिंदूंच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून लाखो लोक भगवे झेंडे हातात घेऊन या मोर्च्यात सामील झाले आहेत. शिवाजी पार्कच्या परिसरात जिथे नजर जाईल तिथे भगवा रंग नजरेस पडत आहे.

या मोर्च्याचे अजून एक वैशिष्ट म्हणजे जन आक्रोश मोर्च्यासाठी पहिल्यांदाच शिंदे गट आणि भाजपचे नेते एकत्र आले आहेत. दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित मोर्चात उतरल्याने महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे आंदोलन केलं जात असल्याचं देखील बोललं जात आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, धर्मांतर विरोधी कायदा लागू करा आणि श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा द्या हे ह्या मोर्च्यातील प्रमुख मुद्दे आहे. भगवे झेंडे, भगवी वस्त्र घालून लाखो लोक ह्या मोर्च्याला एकत्र आले आहेत.

या मोर्च्यात सहभागी झालेले लोक भगव्या रंगाचे कपडे घालून आले आहेत. तसेच अनेकांनी भगवी टोपी, आणि भगवा गमचाही घातला आहे. तसेच मोर्चेकऱ्यांच्या हातात भगव्या पताका आणि विविध घोषणा लिहिलेलं फलक देखील दिसून येत आहेत.अनेकांच्या हातात भूमी रक्षा, राष्ट्र सुरक्षा असं लिहिलेले फलक दिसत आहेत. तर या मोर्च्यात वंदे मातरम, जय श्रीराम आणि जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा अशा घोषणा सातत्याने देण्यात येत आहे.

या मोर्चात भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि केशव उपाध्ये देखील सामील झाले आहेत. तर शिंदे गटाकडून शीतल म्हात्रे, किरण पावसकर आणि सदा सरवणकरही ह्या मोर्च्यात सहभागी झाले आहेत. दोन्ही पक्ष एकत्र ह्या मोर्च्यात उतरल्यामुळे जन आक्रोश मोर्च्याचे कनेक्शन आता महापालिका निवडणुकांशी जोडण्यात येत आहे.

हे ही वाचा:

सुप्रिया सुळेंनी उडवली हिंदू जनआक्रोश मोर्च्याची खिल्ली म्हणाल्या, लव्हचा अर्थ मला कळतो पण जिहादचा माहित नाही

मुंबईत आज मोर्च्यांचा रविवार, शिवाजी पार्क आणि आझाद मैदानात होणार ‘जन आक्रोश’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss