spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लिंगायत समाजाचा देखील मुंबईत महामोर्चा, मागण्या पूर्ण न केल्यास दिला ‘हा’ इशारा

मात्र, लेखी उत्तर न दिल्याने त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता.

मुंबईत आजचा रविवार हा मोर्च्यांचा रविवार ठरला आहे. कारण एकीककडे धर्मांतर कायद्याच्या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चा केला जातोय. तर, दुसरीकडे धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा मिळावा आणि अजून इतर मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी लिंगायत समाजाने देखील आझाद मैदानात महरामोर्च्याचे घोषणा केली आहे. हजारोंच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. तसेच आंदोलकांनी जो पर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही सरकारला दिला आहे.

लिंगायत समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वयक सामिनीतीने आज राज्यभर २२ महामोर्चे काढले आहेत. तसेच लिंगायत समाजाच्या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. सर्व मागण्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, लेखी उत्तर न दिल्याने त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यामुळे आज (२९ जानेवारी) १० वाजल्यापासून आज मैदानावर लिंगायत समाजाचे अनेक नागरिक जमा झाले आहेत. पण, आझाद मैदान येथे आम्ही शांततेत उभे राहून हे आंदोलन करू, असे आंदोलकांनी सांगितले आहे.

काय आहेत लिंगायत समाजच्या मागण्या?

  • लिंगायत समाजाला सांविधानिक मान्यता द्यावी.
  • गावांमध्ये स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा द्यावी.
  • मिरज रेल्वे स्थानकाला बसवेश्वराचे नाव देण्यात यावे.
  • लिंगायत विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधण्यात यावे.
  • राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत समाजासाठी स्वतंत्र कॉलम असावा.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकीकडे जन आक्रोश मोर्च्याबद्दल आपले मत स्पष्टपणे मांडले असताना. आता त्यांनी लिंगायत समाजाच्या मोर्च्याबद्दल देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ” एकतर हा मोर्चा सरकार विरोधात आहे. हे असंवेदनशील सरकार आहे, म्हणून लोकांना रस्त्यावर उतरायला लागतं आहे. लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घ्यायला हवे.”

हे ही वाचा:

सिद्धीविण्याक मंदिराबाबत आदेश बांदेकर यांची पहिली प्रतिक्रिया

शिवाजी पार्कवरील जन आक्रोश मोर्चात, भाजप नेत्यांचे शक्ति प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss