spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs NZ, भारतासाठी करो या मरोचा सामना, ‘या’ खेळाडूंना मिळू शकेल सामन्यात खेळण्याची संधी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० मालिकेतील दुसरा सामना हा आज लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला होता. म्हणूनच भारताला हा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. पहिल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी मध्ये १७६ धावा केल्या आणि भारतीय संघाने १५५ धाव केलया आणि या सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे आजचा सामना हा भारतासाठी शेवटच्या संधी असणार आहे. कारण जर आजच्या होणाऱ्या सामन्यांमध्ये जर भारतीय संघाचा पराभव झाला तर भारतीय संघाला मायदेशातील मालिका गमवावी लागेल आणि हे भारतीय संघाला कधीच नको असेल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया कोणत्याही किंमतीत हा सामना जिंकण्याचा प्रयत्न तर करणारच तर त्यासाठी कदाचित आजच्या सामन्यासाठी संघातील काही खेळाडूंना सामन्यात खेळण्याची संधी देणं गरजेचे आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. तसाही भारतीय संघ पहिला सामना न्यूझीलंडच्या विरोधात पराभूत झाला आहे. तर आजच्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाला पहिल्या सामन्यांमध्ये झालेल्या चुकांना लक्षात घ्यावे लागेल. ईशान किशन बऱ्याच दिवसांपासून टी-२० मध्ये अपयशी ठरत आहे. गेल्या १२ डावांपैकी एकाही डावात त्याने ५० धावांचा आकडा गाठलेला नाही. त्याने १२ डावांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचे अर्धशतक केले होते. मात्र त्यानंतर तो सातत्याने अपयशी ठरत आहे. संघाकडे पृथ्वी शॉच्या रूपाने आणखी एक सलामीवीर तयार झाला आहे. संघ व्यवस्थापन हे ईशानच्या जागी पृथ्वी शॉला आजच्या सामन्यात खेळण्याची संधी देऊ शकते.

भारताच्या विरोधात पहिल्या T२० सामन्यात न्यूझीलंड भारताला पराभूत करेल, याचा कोणी विचारही केला नव्हता. पण कर्णधार मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली या संघाने हे करून दाखवले. पण भारत विरुद्धच्या पहिल्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करत विजय मिळवला .

 

 

हे ही वाचा:

सिद्धीविण्याक मंदिराबाबत आदेश बांदेकर यांची पहिली प्रतिक्रिया

शिवाजी पार्कवरील जन आक्रोश मोर्चात, भाजप नेत्यांचे शक्ति प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss