spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs ENG Under 19 World Cup : महिला अंडर १९ टी-२० विश्वचषक अंतिम सामना थेट पाहण्याआधी जाणून घ्या ‘ही’ माहिती

भारतीय महिला क्रिकेट संघ टी-२० विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीतील सामन्यात इंग्लंडच्या विरुद्ध खेळणार आहे. तर उपांत्य फेरीमध्ये इंग्लंडच्या महिला संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत पदार्पण केले आहे. तर भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर ८ गडी राखून मात करून विजेतेपदाच्या लढतीत धडक मारली.आता हे दोन्हीही अंडर १९ महिला क्रिकेट संघ हे टी-२० विश्वचषकच्या अंतिम टप्प्यात आहेत.

भारतीय महिला क्रिकेटचा संघ जर हा इंग्लंड विरुद्धचा अंतिम टी-२० विश्वचषक सामना जिंकले तर याची नोंद इतिहासात केली जाईल. कारण या आधी भारतातील महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक सामना जिंकला नाही आहे. पण या वेळेस भारतीय संघातील सर्व खेळाडू हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि सलामीवीर श्वेता सेहरावत सध्या या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे, तिने चक्क सहा सामन्यांत २९२ धावा केल्या आहेत. गोलंदाजांमध्ये, पार्शवी चोप्रा ही तिसरी सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे.भारतीय महिला क्रिकेट संघातील फलंदाज शेफाली वर्मा आणि संपूर्ण महिला संघाने त्यांच्या मोहिमेदरम्यान फक्त एक सामना गमावला आणि सुपर सिक्स फेरीदरम्यान गट १ मध्ये अव्वल स्थान मिळवले. म्हणूनच हा भारताची युवा क्रिकेट संघ उत्साहात आहे. पण, अपराजित इंग्लंड संघ त्यांच्या यशाच्या मार्गात उभा आहे. ग्रेस स्क्रिव्हन्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा पराभव हे भारतीय संघासाठी एक आव्हान असणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड महिला अंडर १९ T२० वर्ल्ड कप फायनल आज सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम येथे होणार आहे. या सामन्याची सुरुवात ही भारतीय वेळे नुसार ५:१५ वाजता सुरू होईल. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर वाहिनीवर पाहू शकता. तसेच जर हा सामना तुम्हाला ऑनलाईन पाहायचा असेल तर ‘प्रवाह फॅनकोडवर’ भेट देऊन तुम्ही भारत विरुद्ध इंग्लंड महिला अंडर १९ T२० वर्ल्ड कप फायनल पाहू शकता.

Latest Posts

Don't Miss