spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजपचा सत्यजित तांबेना छुपा पाठिंबा, राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

सध्या महाराष्ट्रामध्ये पदवीधर निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. या पदवीधर निवडणुकीमध्ये (Graduate Election) सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक मतदार संघ (Nashik Constituency). अनेक धक्कादायक राजकीय घडामोडी घडल्यामुळे नाशिकची राज्यभर चर्चा आहे. सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्या उमेदवारीवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु होते. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांना अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आता भाजपाने सुद्धा छुपा पाठिंबा देत सत्यजीत तांबे यांच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी सत्यजीत तांबे यांचा प्रचार सोशल मीडियातून सुरू केला आहे.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा पक्षाने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर हा निर्णय झाल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. “आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला आहे. सत्यजित तांबे तरुण आहेत. होतकरू आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच आमच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे,” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

सत्यजीत तांबे यांनी सुद्धा अनेक वेळा मला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचे सांगितलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून विविध संघटनांसोबत सर्व पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. असाच दावा सत्यजीत तांबे यांनी केला आणि आज विखे समर्थकांनी दिलेला पाठिंबा यावरून बऱ्याच काही गोष्टी स्पष्ट होत आहेत. भाजपाचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी भूमिपत्रांच्या पाठीशी राहावे अशी भावना बोलून दाखवली होती. त्याच अनुषंगाने आज विखे समर्थकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आगामी काळात पदवीधर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्यजीत तांबे कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले तर विखे परिवाराला दिलेला पाठिंबा ही सुद्धा नवीन राजकीय समीकरणांची नांदी ठरेल का? हे पाहण महत्वाचं आहे.

हे ही वाचा:

मराठमोळा गश्मीर महाजनी दिसणार एका नव्या ढंगात, रिम शेख आणि करण कुंद्रासोबत झळकणार ‘या’ नव्या मालिकेत

भारताबाहेरही पसरतेय पठाणची क्रेझ, भारत दौऱ्यापूर्वी ‘ह्या’ खेळाडूने शेअर केला पठाण लुकमधील मनोरंजक व्हिडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss