spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra MLC Election LIVE, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान, एका क्लिकवर जाणून घ्या अपडेट…

आज दि. ३० जानेवारी रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी (Graduate And Teacher Constituency Election) मतदान होणार आहे.

आज दि. ३० जानेवारी रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी (Graduate And Teacher Constituency Election) मतदान होणार आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. हे मतदान करण्यासाठी मतदार सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत येऊ शकतात. तसेच २ फेब्रुवारी रोजी या मतदान निवडणुकांचा निकाल हा जाहीर केला जाणार आहे. तर पाचही जागांची मुदत ७ फेब्रुवारी रोजी संपत आहे. या निवडणुकांमुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप-शिंदे गट यांचा थेट सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.

Nashik Graduate Constituency Election :

  • दुपारी १२ वाजेपर्यंत झालेलं मतदान

– अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक १८. ८४ टक्के मतदान
– नंदुरबार जिल्ह्यात १७. ५४ टक्के
– नाशिक जिल्ह्यात १७. ४७ टक्के
– जळगाव जिल्ह्यात १४. ०९ टक्के
– धुळ्यात १२. ७२ टक्के मतदानाची नोंद

  • नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्या २ तासात साधारणपणे ३ ते ३. ५० टक्के मतदान नाशिक विभागात झालं.
  • नंदुरबार जिल्ह्यातल्या १९ मतदान केंद्रांवर १८ हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी मंत्री के सी पाडवी. खासदार हिना गावित यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
  • राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मतदानाचा हक्क बजावला.
  • शुभांगी पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शुभांगी पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना आपला विजय निश्चित होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
  • महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले.
  • नाशिक जिल्ह्यामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. उमेदवार सत्यजीत तांबे यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाला हजेरी लावली आहे. त्यांच्यासोबत वडील सुधीर तांबे, आई दुर्गा तांबे आणि पत्नी मैथिली मतदानासाठी आले आहेत.

Konkan Teacher Constituency Election :

  • रत्नागिरी जिल्ह्यातील १७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ४१२० मतदार यंदा मतदान करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या मतदानाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
  • अंबरनाथमध्ये कोकण शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून शिक्षक हे अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात मतदान करत आहेत.
  • अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात मतदान केंद्रावर भाजप-शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे सुद्धा मतदान करणार आहेत.
  • पनवेलमधील मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ उडाला. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. परंतु मतदान केंद्र कर्मचाऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला.

Nagpur Teacher Constituency Election :

  • सकाळी १० वाजेपर्यंत झालेलं मतदान – भंडारा : १३. १२ टक्के, गोंदिया : ११. ८३ टक्के
  • दोन तासांमध्ये ६ जिल्ह्यात १३. ५४ टक्के मतदान झाले आहे.
  • सकाळी ८ ते १० या वेळेत गोंदिया जिल्ह्यात ११ . ८३ टक्के मतदान झाले आहे.
  • सकाळी ८ ते १० या वेळेत भंडारा जिल्ह्यात तब्बल १३. १२ टक्के मतदान झाले आहे.
  • विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे सुधाकर अडबाले यांनी सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांना भेटी देणं सुरु केलं आहे. मतदान सुरु झाल्यानंतर सुधाकर अडबाले यांनी नागपूरच्या मोहता सायन्स कॉलेज इथल्या मतदान केंद्रावर हजेरी लावली.
  • नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे दोन्ही प्रमुख उमेदवार एकत्रित आले आणि त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत
  • १२४ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. नागपूर विभागातील ६ जिल्ह्यात ३९ हजार ३९३ मतदार असून नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या ५ जिल्ह्यात सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
  • तसेच गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

Amravati Graduate Constituency Election :

  • मतदान सुरू झाल्यानंतर दोन तासांत ५. ४९ टक्के मतदान झाले आहे.
  • अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी अकोल्यात सपत्नीक मतदान केलं.
  • वाशिम जिल्ह्यातील एकूण २६ मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील १८ हजार ५० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Aurangabad Teacher Constituency Election :

  • मराठवाडामधील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मराठवाड्यातले आठही जिल्ह्यातील ६१ हजार शिक्षक आज आपला आमदार निवडणार आहेत. यासाठी २२७ मतदान केंद्रावर मतदान सुरु झालं असून १४ उमेदवार रिंगणात आहेत.
  • भाजपाचे उमेदवार किरण पाटील यांनी तहसील कार्यालयातील मतदान केंद्रामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Latest Posts

Don't Miss