spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सर्वसामान्यांसाठी खुशखबर! खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण

केंद्र सरकारच्या मध्यस्ती करत घेलेल्या कठोर निर्णयामुळे भारतातील खाद्यतेल विक्रेत्या कंपन्यांनी त्यांच्या तेलाच्या ब्रँडच्या किंमतीत बरीच घट

सध्याच्या ह्या सातत्याने वाढत चालेल्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरणारी महत्वाची बातमी म्हणजे जागतिक स्तरावर तेलाच्या घसरलेल्या किमती आणि केंद्र सरकारच्या मध्यस्ती करत घेलेल्या कठोर निर्णयामुळे भारतातील खाद्यतेल विक्रेत्या कंपन्यांनी त्यांच्या तेलाच्या ब्रँडच्या किंमतीत बरीच घट केल्याचे दिसून येत आहे. Big fall in cooking oil prices

हेही वाचा

विना – पॅकिंग आणि विना – लेबल…

एकीकडे मदर डेअरीने आपल्या खाद्यतेल विक्रेत्या ‘धारा’ या ब्रँडच्या एक लिटरच्या तेलाच्या किंमतीत कपात केली आहे. तर धारा पाठोपाठ आता फॉर्च्युनने देखील आपल्या ब्रँडच्या तेलात बरीच कपात केलेली दिसून येत आहे. धारा ब्रँडने आपल्या तेलाच्या किंमतीत १४ रुपयांची कपात केल्यामुळे आता धारा रिफाइंड सोयाबीन तेलाची किंमत १९४ ऐवजी १८० रुपये प्रति लिटर तर धारा राइस ब्रान तेलाची किंमत १९४ ऐवजी १८० रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे.

हेही वाचा

5 टक्के जीएसटी वाढीमुळे ‘अमुल’ ची उत्पादने…

धरापेक्षा एक पाऊल पुढे जात अदानी – विल्मार यांच्या फॉर्च्युन या कंपनीने खाद्य तेलाच्या किंमतीत जवळपास ३० रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे फॉर्च्युनच्या सोयाबीन तेलाची किंमत १९५ रुपयांवरून १६५ रुपये प्रति लिटर, सूर्यफुल तेलाची किंमत २१० रुपयांवरून १९९ रुपये प्रति लिटर, मोहरीच्या तेलाची किंमत १९५ रुपयांवरून १९० रुपये प्रति लिटर आणि राइस ब्रान तेलाची किंमत २२५ रुपयांवरून २१० रुपये प्रति लिटर करण्यात आलेली आहे. कपात केलेल्या किंमतीतील तेल संबंधित ब्रँडकडून लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल असे, खाद्यतेल कंपनीच्या संचालकांकडून सांगण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss