spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

BMC Budget 2023-24, २ फेब्रुवारीला होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

पायाभूत सुविधा, आरोग्य या गोष्टींवर यंदाच्या महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भर दिला जाणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांच्या अपेक्षा या पूर्ण होणार का?

Mumbai Municipal Corporation Budget 2023-24: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिका (BMC) ही ओळखली जाते. या मुंबई महापालिकाचा या वर्षाचा अर्थसंकल्प (BMC Budget) २ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्प मुंबई महापालिका प्रशासक मांडणार आहेत. पायाभूत सुविधा, आरोग्य या गोष्टींवर यंदाच्या महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भर दिला जाणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांच्या अपेक्षा या पूर्ण होणार का? या कडे अनेकांचं लक्ष हे लागलं आहे.

BMC Budget 2023 : अर्थसंकल्पात होणार साडेचार हजार कोटींची वाढ?

गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्यावर एकूण १८०० कोटींची वाढ केल्यामुळे एकूण ६६२४.४१ इतक्या एकूण कोटींची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे यंदाही पालिकेच्या अर्थसंकल्पात पुरेशी वाढ केली जाईल असा अंदाज बांधण्यात येत आहे. गेल्यावर्षीच्या ४५९४९.२१ कोटींच्या अर्थसंकल्पात यावर्षीही सुमारे साडेचार हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे. गेल्यावर्षी एकूण अर्थसंकल्पात तब्बल १५ टक्के तरतूद हि आरोग्यवर करण्यात आली होती. करण्यात आली होती. यावर्षीच्या अर्थसंकल्पात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठीही विशेष तरतूद आणि नव्या योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्की कोणत्या प्रकल्पांच्या घोषणा होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

नगरसेवक आणि प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेचा कारभार चालवण्यात येतो. तब्बल ३८ वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. यापूर्वी १९८४ मध्ये मुदत संपुष्टात आली होती. १ एप्रिल ८४ ते २५ एप्रिल ८५ या कालावधीत मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. त्यामुळे, तब्बल ३८ वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. १९९० मध्ये महिला आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने ११९० ते दोन वर्षांपासून मुदतवाढ देण्यात आली होती. प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहील. ७ मार्चनंतर मुंबईचा संपूर्ण कारभार पालिकेच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांवर गंभीर आरोप, राऊतांच्या धमकीमुळे शिवसेनेचे आमदार पळून गेले?

ऋषभ पंतच्या फॅन्ससाठी खुशखबर, ‘या’ दिवशी मिळणार डिस्चार्ज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss