spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तीच तीच डाळ खाऊन कंटाळा आलाय?, तर बनवा साऊथ इंडियन स्टाईल रस्सम

रोज तेच तेच पदार्थ खाऊन आपल्या सगळ्यांना कंटाळा येतो. त्याही पेक्षा जास्त कंटाळा नेहमी तेच तेच बनवणाऱ्याला येतो. आपल्या आहारात विविध पदार्थांचा समावेश असल्यास आरोग्य निरोगी राहते व खायला ही मज्जा येते.

रोज तेच तेच पदार्थ खाऊन आपल्या सगळ्यांना कंटाळा येतो. त्याही पेक्षा जास्त कंटाळा नेहमी तेच तेच बनवणाऱ्याला येतो. आपल्या आहारात विविध पदार्थांचा समावेश असल्यास आरोग्य निरोगी राहते व खायला ही मज्जा येते. पण काही वेळा गृहिणींना प्रश्न पडतो कि नेहमी काय वेगळे बनवायचे? म्हणून आम्ही आज तुम्हाला एक विशेष रेसिपी सांगणार आहोत. रोज डाळ भट खाला कि नकोस वाटो म्हणून आपण आज साऊथ इंडियन स्टाईल रस्सम (South Indian Style Rassam) कशी बनवली जाते हे बघुयात. रस्सम ही साऊथ इंडियन लोकांची डाळ आहे. दक्षिणेकडील लोक भातासोबत रस्सम खातात. तसेच या रस्समचे अनेक फायदे देखील आहेत तर जाणून घेऊयात कशी बनवली जाते रस्सम

साहित्य

एक कप तूर डाळ
२ टीस्पून चिंच
१ टीस्पून तिखट
१टीस्पून रस्सम मसाला
१ टीस्पून सांभार मसाला
१टीस्पून गूळ
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून उडीद डाळ
१/४ टीस्पून हिंग
१/८ टीस्पून हळद
६ मेथी दाणे
२ टेबलस्पून तेल
१० कढीपत्त्याची पान

पाककृती

  • सर्वात प्रथम एका भांड्यात तूर डाळ (Pigeon pea)घेऊन ती व्यवस्थित धुवून घ्या. नंतर डाळीत एक कप पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवा. डाळ शिजल्यावर पाणी काढून घ्या.
  • एका भांड्यात किंवा प्रेशर कुकर मध्ये टोमॅटो (tomato) उकडून घ्यावेत व थंड झाल्यावर साली काढून मिक्सर मध्ये वाटून घ्या. अर्धा कप गरम पाणी त्यात चिंच (tamarind)भिजत ठेवा, १५ मिनिटानंतर चिंचेचा कोळ तयार असेल.
  • एका भांड्यात तेल गरम करा. उडीद डाळ(Vigna mungo), मेथी दाणे (Fenugreek seeds)फोडणीला घाला व नंतर अनुक्रमे मोहोरी (Mustard), हिंग(hing ), हळद(turmaric), कढीपत्ता(curry leaves) फोडणीला घाला. फोडणीचा छान वास येताच यामध्ये वाटलेले टोमॅटोचे मिश्रण व शिजवून घोटून घेतलेली डाळ घाला.

  • त्यानंतर रस्सम मध्ये चिंचेचा कोळ, मीठ, गूळ घालून रस्सम ढवळून घ्या. यात तिखट सांभार मसाला, रस्सम मसाला घालून पाच मिनिटे उकळवावे. चव पाहून तिखट, मीठ, चिंच वाटल्यास आणखी घालावे. अश्या प्रकारे तुमची गरमा गरम रस्सम तयार झाली असेल.

हे ही वाचा:

Budget 2023 – महत्त्वाच्या घोषणा घ्या जाणून

उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ पुन्हा घसरली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss