spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra MLC Election Results 2023 Live Update, कौल कुणाला? जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पदवीधर निवडणुकीचे वारे जोरात वाहत होते. तर आज अनेक ठिकाणी पदवीधर निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरवात झाली आहे.

काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पदवीधर निवडणुकीचे वारे जोरात वाहत होते. तर आज अनेक ठिकाणी पदवीधर निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरवात झाली आहे.आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला होणार सुरुवात झाली आहे. राज्यातील नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा अंतिम निकाल काही तासांवर आहे. पण, त्यातल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.

नागपुरात पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले आघाडीवर

  • तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरवात
  • नाशिकमध्ये दुसऱ्या फेरीत सुद्धा सत्यजित तांबे आघडीवर
  • तांबे यांना १५, ७७४ तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना ७,७०८ मते.
  • अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे ८,२६६ मतांनी आघाडीवर.
  •  विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीची पहिल्या फेरी पूर्ण.
  • नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक, पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे आघाडीवर
  • पहिल्या फेरीच्या अंतिम टप्यात सत्यजीत तांबे आघाडीवर.
  • मागील दीड तासापासून सुरू आहे पहिली फेरी
  • शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात लढत सुरूच
  • एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
  • पहिल्या फेरीच्या अंतिम टप्यात सत्यजीत तांबे आघाडीवर
  • नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुक मतमोजणीची पहिली फेरी एक तासापासून सुरू
  • शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात लढत सुरूच
  • काही टेबलवर शुभांगी तर काही टेबलवर सत्यजीत आघाडीवर
  • नाशिकमध्ये सत्यजित तांबे आघाडीवर तर शुभांगी पाटील पिछाडीवर
  • Kokan MLC Election, कोकणात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. पहिल्या फेरीत त्यांना तब्बल २२ हजार मते मिळाली आहेत.
  • Nashik Padvidhar Election Result, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे. एकूण टपाली मतदान ५८ वैध मते ४६ अवैध मते १२
  • नाशिकमध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ
  • नाशिकमध्ये सत्यजित रातांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात काँटे कि टक्कर
  •  नागपूरमध्ये माविआचे सुधाकर अडबाले विजय आघाडीवर. सुधाकर अडबाले यांना १३ हजार मतं. तर भाजपचे नागो गाणावर पिछाडीवर
  •  अमरावतीमध्ये माविआचे धीरज लिंगाडे आघाडीवर
  •  औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर.
  • नाशिक जिल्ह्यात शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजीत तांबे अशी लढत आहे. सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे. २ लाख ६२ हजार ६७८ पैकी १ लाख २९ हजार ४५६ मतदारांनी हक्क बजावला आहेत त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे.
  • औरंगाबादमध्ये भाजपनं नवख्या किरण पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पहिल्यांदा निवडणूक लढवणारे किरण पाटील यांच्यासमोर विक्रम काळेंचं तगडं आव्हान उभं होतं आणि म्हणून औरंगाबादच्या निवडणुकीचा चर्चा रंगली..
  • अमरावतीत भाजपचे रणजीत पाटील हे तिसऱ्यादा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात मविआचे धीरज लिंगाडे उभे आहेत. तर तिकडे नागपुरात २२ उमेदवार रिंगणात आहे.
  • कोकण शिक्षक मतदारसंघ मविआचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत आहे.

Latest Posts

Don't Miss