spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तब्बल ३० तासांच्या मोजणीनंतर अमरावतीत धीरज लिंगाडेंचा दणदणीत विजय

तब्बल ३० तासांनंतर अमरावतीचा निकाल हा लागला आहे आणि यामध्ये धीरज लिंगाडे यांचा दणदणीत विजय हा झाला आहे.

गेल्या कितीतरी दिवसांपासून राज्यात पदवीधर निवडणुकांमुळे वातावरण चांगलच तापलंय. त्यातच अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दाखल केलेल्या अर्जामुळे हे वातावरण अजूनच तापले होते. काल दि २ फेब्रुवारी रोजी अखेर महाराष्ट्रातल्या या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये नाशिक निवणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष हे लागले होते. काल रात्री उशिरा नाशिकचा निकाल हा लागला आणि त्यामध्ये सत्यजित तांबे हे विजयी झाले. परंतु नुकताच अमरावतीचा निकाल हा लागला आहे. तब्बल ३० तासांनंतर अमरावतीचा निकाल हा लागला आहे आणि यामध्ये धीरज लिंगाडे यांचा दणदणीत विजय हा झाला आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांचा विजय झाला आहे. धीरज लिंगाडे पाटील यांच्या विरुद्ध डॉ. रणजित पाटील हे उमेदवार म्हणून उभे होते. रणजित देशमुख यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. धीरज लिंगाडे पाटील यांना ४६ हजार ३४४ मते मिळाली. तर रणजित देशमुख यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली आहेत. अत्यंत चुरशीच्या या लढतीत लिंगाडे पाटील यांनी अखेर बाजी मारली आहे. भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांचा ३ हजार ३६८ मतांनी पराभव झाला आहे.

तसेच या विजयानंतर धीरज लिंगाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी बोलत असताना ते म्हणाले, “महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे. अतिशय आनंद होतो आहे. आम्ही ही लढाई जिंकलो आहोत. आव्हान जरी तगडं होतं तरी आम्हीही काही कमी नव्हतो. संपूर्ण महाविकास आघाडी आणि आम्ही अतिशय ताकदीने लढलो आहोत. मतदारांनी आम्हाला कौल दिला आहे. याप्रसंगी सगळ्या मतदारांचे मी आभार व्यक्त करतो. यापुढे आता विजयी घौडदोडीस सुरुवात झाली आहे.” याचबरोबर, “मी मातोश्रीवर आणि शरद पवारांकडेही जाणार आहे. सगळ्यांची भेट घेणार आहे, कारण माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे मी सगळीकडे जाईन आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेईन. आम्ही मतदारांना जे काही आश्वासनं दिली आहेत, त्या कामाला आम्ही सुरुवात करू.” असंही लिंगाडे म्हणाले. याशिवाय, “मतदारांनी जो विश्वास आमच्यावर टाकला, महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्या संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्या सर्व संघटना त्याचप्रमाणे जुनी पेंशन संघटना या सगळ्यांमुळे हा विजय झाला आहे. शेवटी विजय हा नेहमी मतदारांचाच होत असतो, त्यापुढे संपत्ती वैगेरे कुठे कामी येत नसते. ज्या ठिकाणी मतदारांची बाजू घेण्याची वेळ येईल, आम्ही मागे हटणार नाही.” असंही धीरज लिंगाडे यांनी यावेळी सांगितलं.

हे ही वाचा:

NIA ला ई-मेलद्वारे मुंबईवर हल्ला करण्याची धमकी

संजय राऊत आणि नारायण राणे यांच्या वादात वाढ, राऊतांनी पाठवली मानहानीची नोटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss