spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विदर्भातील लोक संतापले, सगळीकडे एकच गोंधळ

वर्धा (wardha) येथे आजपासून ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झाली. पाच दशकानंतर वर्ध्यात आज, सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्‌घाटन झाले. यंदाच्या संमेलनामध्ये वर्धा भूमीचा वैचारिक वारसा (Ideological heritage) जपण्याकरता प्रबोधन केले गेले.

वर्धा (wardha) येथे आजपासून ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झाली. पाच दशकानंतर वर्ध्यात आज, सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्‌घाटन झाले. यंदाच्या संमेलनामध्ये वर्धा भूमीचा वैचारिक वारसा (Ideological heritage) जपण्याकरता प्रबोधन केले गेले. तसेच वैचारिक कार्यक्रमांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले. दरवर्षी वर्ध्यामध्ये मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या उदघाट्न सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निमंत्रित करण्यात आले होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (All India Marathi Literature Conference) उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री भाषण देत असतानाच विदर्भातील लोकांनी (People of Vidarbha) विदर्भच्या घोषणा (announcement) देण्यास सुरुवात केली. त्यामुळं सभेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. यावेळी उपस्थित पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटलं की विदर्भातही शेतकरी आत्महत्या करत आहे. दुसरीकडे वेगळा विदर्भ राज्य करुन विदर्भातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा. देशासह राज्यात वाढलेल्या बेरोजगारीमुळे तरुणाई नैराश्यात जात आहे. त्या नैराश्यातून तरुण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी या विषयांवर बोलण्याची गरज असताना मुख्यमंत्री हे सरकार कसं पाडलं आणि आपण मुख्यमंत्री कसे बनलो हे सांगतात, अशी टीका यावेळी आंदोलकांनी (protesters) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यावर केली केली.

वर्ध्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा हा पहिलाच दिवस होता. मात्र विदर्भातील लोकांनी घातलेल्या गोंधळामुळं हा दिवस चर्चेत आला आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण चालू असताना काही लोक घोषणा देऊ लागले. हळू हळू या घोषणा तीव्र झाल्या आणि एक वेगळाच विदर्भवाद सुरु झाला. या गोंधळात महिलावर्गाची आक्रमक झाल्याचे दिसले. भाषण चालू असताना विदर्भवाद्यांनी कागदे देखील उडवली अशी माहिती पुढे आली . त्यामुळे यावेळी उपस्थित पोलिसांनी ( police)घोषणा देणाऱ्यांना ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

BMC Budget 2023, उद्या सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

मालवणच्या आंगणेवाडीत भाजपची जत्रा | Anganewadi Jatra | Devendra Fadnvis | Narayan Rane | BJP |

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss