spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पौष्टिक आणि चवदार मेथीचे वडे

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आपण चहा तर घेतोच त्या सोबत आपण आपल्याला लागलेल्या भुकेसाठी काही ना काही पदार्थ तयार करत असतो. अश्या वेळी आपण चहासोबत भजी,वडे असे काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा आपली असते.

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आपण चहा तर घेतोच त्या सोबत आपण आपल्याला लागलेल्या भुकेसाठी काही ना काही पदार्थ तयार करत असतो. अश्या वेळी आपण चहासोबत भजी,वडे असे काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा आपली असते. परंतु रोज बाहेरील ठेल्यावरिती तयार केलेले पदार्थ आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात. अश्या वेळी आपल्याला चटपटीत काय बनवावे असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो. मेथीची भाजी खायची म्हंटल कि मोठ्यापासून लहानापर्यत सर्वच नाक मुरडतात. अश्या वेळी आपण मेथी पासून तयार केलेले वडे आवडीने फस्त करू. चला तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत स्वादिस्ट आणि चवदार मेथीचे वडे बनवण्याची साधी आणि पटकन बनेल अशी रेसिपी.

मेथीचे वडे बनव्यासाठी लागणारे साहित्य –

  • मेथीची पाने – २ कप (बारीक चिरून घेतलेली)
  • बेसन – १/२ कप
  • पोहे – १ कप (भिजवून घेतलेले)
  • लाल मिरची पावडर – १ टेबलस्पून
  • हळद – १/४ टेबलस्पून
  • हिंग – १/२ टेबलस्पून
  • कोथिंबीर – १/४ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)
  • पांढरे तीळ – २ टेबलस्पून
  • पाणी – गरजेनुसार
  • कांदा – २ टेबलस्पून (उभा चिरून घेतलेला)

लसूण पेस्ट तयार करण्यासाठीचे साहित्य :-

  • हिरव्या मिरच्या – ४
  • लसूण – ७ ते ८
  • आलं – १ इंचाचा तुकडा ३
  • धणे – १ टेबलस्पून
  • जिरे – १ टेबलस्पून

  • मेथीचे वडे बनवायची कृती –

सर्वप्रथम लसूण पेस्ट तयार करायची आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आले, हिरवी मिरची, लसूण आणि धने घेऊन ते मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्यावे.

एका भांड्यामध्ये भिजवून ठेवलेले पोहे घेऊन त्या पोह्यांवर थोडे पाणी शिंपडून ते हाताच्या मदतीने कुस्करून घ्यावे. आता त्यामध्ये तयार केलेली पेस्ट घाला. मिरची पावडर, हळद आणि हिंग, उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मेथी, बेसन आणि चवीनुसार मीठ त्यामध्ये घालावे.

त्यानंतर ते सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे. या तयार झाल्या मिश्रणाचे गोल चपटे वडे तयार करून घ्यावे. वडे तयार झाल्यावर एका डिशमध्ये थोडेसे पांढरे तीळ घ्यावे, आणि ते मेथीचे वडे त्या पांढऱ्या तिळांमध्ये मिसळून घ्यावे.

एका कढईत तेल गरम करून घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये ते वडे घालून त्या वडयांना ब्राऊन रंग येई पर्यंत तळावे.ब्राऊन रंग आल्यावर त्यांना एका प्लेटमध्ये कडून घ्यावे गरमागरम वडे तयार आहेत.

हे ही वाचा : 

आंबट गोड अननस खाण्याचे फायदे माहिती आहेत का ?

Health Tips : मनुक्यांचं पाणी प्या अन् आजारापासून रहा दूर

बेडरूम सजवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्सचा करा वापर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss