spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा माविआ एकत्रच लढणार, संजय राऊतांची घोषणा

काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन (Vanchit Bahujan Aghadi) आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये (Shivsena Thakre Group) युती झाल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबर युती झाल्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होत. तरीही युती कायम राहिली. यावर महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल किंवा मतभेद आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झाली होती. तर आता कसबा आणि चिंचवड निवडणूक तोंडावर आहे. तर महाविकास आघाडी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कसबा आणि चिंचवड निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या भूमिकेबद्दल सांगितल आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुंजन आघाडी या दोन्ही पक्षांच्या युतीनंतर वंचित बहुजन पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात वाद झाले होते. कारण प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह्य विधान केलं होत. तर याला विरोध करत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रेतिउत्तर दिले होते पण यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी मध्ये युती कायम राहिली. पण या विषयावर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन यांच्या युतीबाबत माहित नसल्याचे सांगितले होते. तर यावर महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झाली. तर आज संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी अनेक कसबा चिंचवड निवडणुकीसह अनेक विषयांवर चर्चा केली. संजय राऊत यांनी सांगितलं की महाविकास आघाडी ही कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा एकत्रित लढणार आणि आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच आहे. त्यांचा पराभव व्हायला पाहिजे. हे आम्ही विधानपरिषदेच्या निवडणुकीत दाखवून दिले आहे”. असे संजय राऊत प्रसारमाध्यमांना म्हणाले.

संजय राऊत विधानसभा निवडणुकीसंदर्भात म्हणाले की, “विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाचपैकी चार जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. एक जागा भाजपने जिंकली आहे. अमरावती आणि नागपूर महत्वाच्या जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या आहेत. या जागा महाविकास आघाडीतील एकीमुळं जिंकल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं कसबा आणि चिंचवड दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्र लढेल. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेऊ असे संजय राऊत म्हणाले. या दोन्ही ठिकाणी जिंकण्याची संधी कोणाला यावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ” असे संजय राऊत यांनी सांगितल.

 

हे ही वाचा : 

Mumbai BMC Budget 2023 Live Update, आज मुंबईकरांना काय मिळणार ? जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लीकवर

World Cancer Day 2023, जाणून घ्या कॅन्सरचा इतिहास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss