spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pune Bypoll election, कसबा – चिंचवड पोटनिवडणुकांसाठी भाजपचे उमेदवार ठरले

गेल्या अनेक दिवसांपासून कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchvad) पोटनिवडणुकांची चर्चा ही सुरु आहे. पुण्यातील (Pune) कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (laxman Jagtap) यांचे निधन झाले.

गेल्या अनेक दिवसांपासून कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchvad) पोटनिवडणुकांची चर्चा ही सुरु आहे. पुण्यातील (Pune) कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (laxman Jagtap) यांचे निधन झाले. त्यानंतर आता या रिक्त झालेल्या जगावर निवडणुका घेण्यात येणार आहे. परंतु ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत. कसबा मतदार संघासाठी भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasne) आणि चिंचवड मतदार संघासाठी भाडपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

 अखेर आज भारतीय जनता पार्टी कडून त्यांच्या उमेदवारांची नवे जाहीर करण्यात आली आहेत. भारतीय जनता पार्टीकडून कसबा मतदारसंघासाठी हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे. या दोन्ही मतदार संघामध्ये इच्छुकांची यादी हि मोठी होती. त्यामुळे भाजपकडून नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष हे लागले होते. या उमेदवारी करीत अनेक तर्क वितर्क हे लावले जाते होते. पर्णातू आता सर्व चर्चांवर अखेर पूर्णविराम हा लागला आहे.

Latest Posts

Don't Miss