spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

BMC Budget 2023, यंदाचा बजेट ५२ हजार कोटींचं, अवघ्या १५ ते २० मिनिटांत सादर झाला पालिकेचा अर्थसंकल्प

मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना आज दि. ४ फेब्रुवारी रोजी (शनिवारी) सादर केला. तर या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी २७ हजार २४७ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. महापालिकेच्या एवढ्या आर्थिक वर्षात यंदा पहिल्यांदाच आयुक्तांनी अर्थसंकल्प हा अवघ्या १५ ते १८ मिनिटात अर्थसंकल्प सादर केला. इतर वेळी हा सर्व अर्थसंकल्प सादर करायला तब्बल ३ – ४ तास लागत असतात पण यंदा हा अर्थसंकल्प १७ मिनीटात सादर केला आहे आणि नंतर पत्रकार परिषद घेण्यात आली आहे.

तसेच गेल्या वर्षीच्या तुलने यंदाच्या वर्षी १४ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तर या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचे प्रस्ताविले आहे. तर मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी ३,५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शनिवारी मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू (P. Velrasu) यांनी शनिवार ४ फेब्रुवारीला मुंबई महापालिका सभागृहात पहिल्यांदाच प्रशासक व पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे सादर केला. त्यानंतर हा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे मांडण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या अर्थसंकल्पाचे आकारमान १४ टक्क्यांनी वाढला असून यामध्ये करवाढी संदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे.

BMC ने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये विविध सामाजिक प्रभाव उपक्रमांसाठी २५० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. निधीचे वाटप विविध हेडर अंतर्गत करण्यात आले आहे ज्यात महिलांसाठी आर्थिक योजना, दिव्यांग, ट्रान्सपरन्स, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रशिक्षण योजना यांचा समावेश आहे.

बीएमसीने रस्ते, स्ट्रॉम वॉटर ड्रेन आणि जल प्रकल्प यासारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधांवर खर्च करण्यासाठी २७,२४७ कोटी रुपये राखून ठेवले आहेत.

मोफत पुस्तके, गणवेश आणि इतर साहित्याचे वाटप सुरू राहणार असून त्यासाठी १३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात १,०६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी ३,५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

बजेट अंदाजानुसार BEST साठी रु ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली

हे ही वाचा : 

कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा माविआ एकत्रच लढणार, संजय राऊतांची घोषणा

आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलं चॅलेंज, वरळीत माझ्याविरोधात निवडणूक लढा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss