spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Valentine’s Day 2023, तुमच्या व्हॅलेंटाईन ला हे खास दागिने द्या भेट

येत्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन दिवस (February 14 is Valentine's Day)साजरा केला जाणार आहे. हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी बऱ्याच मित्र मंडळींना प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे आपल्या व्हॅलेंटाईनला काय भेटवस्तू द्यावी.

येत्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन दिवस (February 14 is Valentine’s Day)साजरा केला जाणार आहे. हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी बऱ्याच मित्र मंडळींना प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे आपल्या व्हॅलेंटाईनला काय भेटवस्तू द्यावी. मुले या गोष्टींमध्ये फार गोंधळून जातात,कारण मुलींकडे सगळ्या लहान मोठ्या गोष्टी असतात यामध्ये त्यांना आवडणार काय द्यावं हा जागतिक प्रश्न सर्व मुलांना पडलेला असतो. म्हणून आपण आज जाणून घेणार आहोत कि आपल्या प्रिय व्यक्तीस कोण कोणत्या भेटवस्तू देऊन व्हॅलेंटाईन साजरा केला जाऊ शकतो.

डायमंड नेक्सस राउंड कट सिंगल बेल पेंडेंट (Diamond Nexus Round Cut Single Bell Pendant)
दागिने हा स्त्रियांचा जीव कि प्राण असतो. मॅचिंग ड्रेस वर मॅचिंग इअररिंग्ज तसेच विविध नेकलेस हे सर्व स्त्रियांना खूप आवडते हिऱ्याचा नेकलेस त्यांच्या सुंदर देहयष्टीला अगदी शोभेसा असतो. त्यामुळे हिऱ्यांचा नेकलेस हे व्हॅलेंटाईन दिनी तुमच्या प्रिय व्यक्तीस दिलेली एक खास भेट ठरु शकते.

मोत्याची अंगठी(pearl ring)
मोत्याची अंगठी सुंदर हातांची उत्तम भेट आहे.पारंपारिक रत्नांना मोती हा नेहमी लक्षवेधी आणि आकर्षक वाटतो ही अंगठी स्टर्लिंग सिल्व्हर म्हणजेच चांदी आणि सोन्याच्या गोल्ड वर्मीलमध्ये उपलब्ध आहे.

रुबी सॉलिटेअर लटकन हार(Ruby Solitaire Pendant Necklace)
या नैसर्गिक रुबी सॉलिटेअर लटकन नेकलेस आहे या मध्ये चमकदार गोल डायमंड अंडाकृती रुबी असते. जी फार महाग असते. हे 14k पांढर्‍या सोन्यात बनवले जाते. हे नेकलेस दिसायला फार सुंदर असते हे तुमच्या प्रिय व्यक्तीला नक्की आवडेल.

डायमंड बोलो टेनिस ब्रेसलेट(Diamond Bolo Tennis Bracelet)
हा एक ब्रेसलेट चा प्रकार आहे जे कि तरुणी हातात घालतात हे बोलो शैलीतील टेनिस ब्रेसलेट प्रकारात मोडते हे उच्च दर्जाच्या हिऱ्यांचा वापर करून बनवले जाते. तसेच हे गुलाब सोने, सोने किंवा पांढर्‍या सोन्याला साखळीसारखा आकार देऊन बनवले जाते. हे दिसायला आकर्षित आणि विविध रंगाचे मोती रत्न हिरे या ब्रेसलेट मध्ये वापरले जाऊ शकतात किंवा भेट देण्यात येतात. हे ब्रेसलेट तुमच्या साहचरणीस दिल्यास ती नक्कीच खुश होईल.

हे ही वाचा : 

फडणवीसांच्या समोर नारायण राणेंचं मोठं विधान म्हणाले, भाजपत आलो हीच माझी अडचण,कारण …

स्टीव्ह स्मिथ भारतीय संघासाठी धोक्याची घंटा, आर अश्विन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss