spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Grammy Awards 2023, भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा कोरलं ग्रॅमी पुरस्कारावर नाव

ग्रॅमी पुरस्कारासोबत (Grammy Awards) भारतीय संगीतकार रिकी केज (Ricky Kej) यांचं खास नातं आहे. संगीतप्रेमींसाठी मानाचा असणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा (Grammy Awards 2023) नुकताच पार पडला असून या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

Ricky Kej On Grammy Awards 2023 : ग्रॅमी पुरस्कारासोबत (Grammy Awards) भारतीय संगीतकार रिकी केज (Ricky Kej) यांचं खास नातं आहे. संगीतप्रेमींसाठी मानाचा असणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा (Grammy Awards 2023) नुकताच पार पडला असून या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ricky Kej (@rickykej)

 रिकीने यापूर्वी सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम श्रेणी अंतर्गत दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत . २०१५ मध्ये त्याच्या ‘विंड्स ऑफ संसारा’ अल्बमसाठी आणि २०२२ मध्ये त्याच्या अल्बम डिव्हाईन टाइड्ससाठी पुरस्कार जिंकले आहेत ग्रॅमी नामांकनानंतर त्याच्या अल्बमबद्दल बोलताना, केज म्हणाले, “तिसर्‍या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला आहे. डिव्हाईन टाइड्स हा अल्बम हा आजपर्यंतचा माझा सर्वात सर्जनशील आणि यशस्वी अल्बम आहे आणि त्याला मिळालेल्या प्रशंसामुळे मी सन्मानित आणि नम्र आहे. स्टीवर्ट कोपलँड आणि मी इमर्सिव्ह ऑडिओ अनुभव म्हणून Divine Tides तयार केले. आम्ही आमच्या संगीताद्वारे आमच्या प्रेक्षकांना सुंदर ठिकाणी आणि भावनांना पोहोचवण्याची आशा करतो.

ग्रॅमी पुरस्कार पटकावल्यानंतर रिकी केज यांनी खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रिकी केज यांनी ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,”कृतज्ञता व्यक्त करतो. माझा तिसरा ग्रॅमी पुरस्कार”. रिकी यांच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


रिकी केज कोण आहे?

भारतातील एक लोकप्रिय संगीतकार म्हणून रिकी केज यांना ओळखले जाते . रिकी केजने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयासह अनेक प्रतिष्ठित ठिकाणी कामगिरी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, रिकीने जगभरातील ३० देशांमध्ये एकूण १०० संगीत पुरस्कार जिंकले आहेत. रिकीला त्याच्या कामासाठी युनायटेड नेशन्स ग्लोबल मानवतावादी कलाकार आणि भारताचे युवा आयकॉन म्हणून नामांकन मिळाले आहे. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या लोकप्रिय अल्बम ‘डिव्हाईन टाइड्स’मध्ये ९ गाणी आणि ८ म्युझिक व्हिडिओंचा समावेश आहे.भारताचा युवा आयकॉन म्हणून देखील त्याला सन्मानित करण्यात आले आहे. रिकीने आता ग्रॅमी पुरस्काराच्या माध्यमातून देशाचे नाव जगात रोशन केले आहे.

हे ही वाचा : 

Earthquake In Turkey, ७. ९ रिश्टर स्केलच्या भूकंपानं तुर्की हादरलं

एकनाथ खडसेंच खळबळजनक विधान म्हणाले, माझ्याविरोधात घडवून षडयंत्र रचले….

एकनाथ खडसेंच खळबळजनक विधान म्हणाले, माझ्याविरोधात घडवून षडयंत्र रचले….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss