spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया, आमच्याकडे राजीनामा…

सद्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडवणारी ही घटना समोर येत आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा आहे अश्या चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगू लागल्या आहेत.

सद्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडवणारी ही घटना समोर येत आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा आहे अश्या चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगू लागल्या आहेत. तसेच अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षामध्ये राजकीय वाद असल्याच्या बातम्या देखील समोर येत होत्या आणि आता थोरातांचा राजीनामा यामुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले आहे. तर या प्रकरणी नाना पटोले यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया हि दिली आहे.

आज बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा आहे अश्या अनेक चर्चा रंग आहे. या सर्व प्रकरणी नाना पटोले यांना विचारले असता, ते म्हणाले आहेत की, आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही. तसेच नाना पटोले पुढे म्हणाले आहे की, आता झालेल्या पदवीधर मतदार संघामध्ये काँग्रेस पक्षाला यश आलं आहे . काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात यश यायला सुरुवात झाली आहे. तसेच ते पुढे म्हणले की, हे राजकारण आहे त्याकडे लक्ष देवू नका. जनतेसाठी लढण हे काँग्रेस च काम आहे. तसेच नाना पटोले यांनी आज बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात आमच्यासोबत बोलत नसल्याचं पटोले म्हणाले आहे.पण पत्रकारांशी बोलत असतील तर तुम्ही सांगा असा खोचक टोलाही पटोले यांनी लगावला आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून अनेक वाद हे बघायला मिळाले. त्यामुळे प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर देखील आला. सत्यजित तांबेंच्या वतीनं आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात दंड थोपटून मैदानात उतरले होते. आणि त्याच सोबत बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या विरोधातली नाराजी त्यांनी बोलून दाखवली. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पत्रानंतर पक्षासह राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला.तसेच नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? थोरातांचं मन वळवणार की, नवा बदल घडवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

Valentine’s Day 2023, तुमच्या व्हॅलेंटाईन ला हे खास दागिने द्या भेट

चहाच्या उरलेल्या चोथ्याचा असा करा उपयोग, डाग होतील गायब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss