spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवारांनी सांगितला बाळासाहेब थोरात याच्याशी फोनवरील संभाषणाचा किस्सा, तो माझा पक्षांतर्गतचा प्रश्न…

सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. कारण नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी बंड केला आणि त्यानंतर काल काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी ट्विट करत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात मतभेद असल्याचे सांगितले. पण या नंतर बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलें यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं. आणि नंतर नाना पटोले यांनी पक्षाचा राजीनामा दिला. आता या प्रकरणासंदर्भात विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) या विषयावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्या संदर्भात अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना भाष्य केले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत आणि पक्षामध्ये फूट पडल्याची घटना समोर येते आहे. कारण काही महिन्यात पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंद केला आणि शिवसेनेत दोन गट तयार झाले. त्यानंतर आता शिवसेने प्रमाणेच काँग्रेसमध्ये देखील असेच घडणार आहे का असा सवाल उपस्थित केला जातो आहे कारण नाशिक पदाविदार निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी बंड केला आणि त्यानंतर काल काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी ट्विट करत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात मतभेद असल्याचे सांगितले. आणि आजच काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यां पक्षात राजीनामा दिला. आज विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुण्यामध्ये दाखल झाले होते त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी फोन झालेली चर्चेबद्दल माध्यमांना सांगितल. अजित पवार म्हणाले की “बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला अशी बातमी मी माध्यमांमध्ये पाहिली. मी त्यांना आज वाढदिवसानिमित्त फोन केला होता. त्यावेळी मी म्हटलो की, बाळासाहेब आज तुमचा वाढदिवस आहे. आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं या शुभेच्छा. मात्र, एक बातमी आहे आणि त्याविषयी आज तुम्हाला विचारावं की नको हे मला कळत नाही. कारण आज तुम्ही गडबडीत असाल.”असे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितलं.

अजित पवार पुढे म्हणाले की “यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, दादा, मी राजीनामा दिलेला आहे. तो माझा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेईन,” असे अजित माहिती अजित पवार यांनी माध्यमांना सांगितलं.

हे ही वाचा : 

संसदेत राहुल गांधींनी केला सवाल, गौतम अदानी आणि नरेंद्र मोदींचं काय नातं?

आज रोझ डे निम्मित जाणून घ्या तुमचं राशी भविष्य, ७ फेब्रुवारी २०२३

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss