spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल, व्हिडिओ शेअर करत केली पोलखोल

राज्यातील सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंड केला आहे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. ताबा ४० लोकांना घेऊन त्यांनी हा बंड केला होता. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन पडले आणि दोन्ही गटात वाद हे सुरूच झाले

राज्यातील सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंड केला आहे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. ताबा ४० लोकांना घेऊन त्यांनी हा बंड केला होता. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन पडले आणि दोन्ही गटात वाद हे सुरूच झाले. हेच वाढ आता आणखी वाढत चालले आहेत. त्यातच आता आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे ना एक खुले आव्हान दिले होते यावर प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर चॅनलचा हल्लाबोल केला परंतु खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ शेअर करत चांगलीच पोलखोल ही केली आहे.

काल दि ७ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात होते. या दोन्ही नेत्यांचा कोळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा आणि शिंदे गटाच्या नेतेमंडळींनी भाषणांमधून जोरदार टोलेबाजीही केली. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू होती. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपाची नेतेमंडळी शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं या कार्यक्रमाबद्दल बोललं गेलं. त्यानुसार भाषणांमधून अपेक्षेप्रमाणे टीका-टिप्पणीही झाली.

या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ शेअर करत ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंचाही उल्लेख केला आहे. या भाषणावेळचा एक व्हिडीओ संजय राऊतांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सभेच्या ठिकाणी अनेक खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत. यावरून सध्या सत्ताधारी आणि ठाकरे गट यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. हा कार्यक्रम सभा नसून सत्काराचा होता, तिथे एवढी गर्दी अपेक्षित नव्हती, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. मात्र, त्याचवेळी विरोधकांकडून यावरून खोचक टीका केली जात आहे.

 संजय राऊतांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर करत टोला लागावला आहे. “मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. वरळी कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला..कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय..३२ वर्षांचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना?” असा खोचक सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

काही दिवसांपूर्वी वरळी या मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलत असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. यावेळी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले होते. हिंमत असेल तर माझ्याविरोधात वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावर काल दि. ७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या वरळी या मतदारसंघात जाही सभा घेतली. त्यावेळेस आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देताना “एकनाथ शिंदे छोटी आव्हान स्वीकारत नाही. मी मोठी-मोठी आव्हानं स्वीकारतो. मी असेच मोठे आव्हान सहा महिन्यांपूर्वी स्वीकारलं”, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.

हे ही वाचा : 

अजित पवारांनी सांगितला बाळासाहेब थोरात याच्याशी फोनवरील संभाषणाचा किस्सा, तो माझा पक्षांतर्गतचा प्रश्न…

जितेंद्र आव्हाडांच्या वक्त्यव्यांवर संभाजी छत्रपती संतापले, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss