spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

माविआ सरकार कोसळल्या मागे पटोले कारणीभूत, असे म्हणणाऱ्या शिवसेनेवर अतुल लोंढे संतापले

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी दिसून येत आहेत. कारण काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि त्यामुळे शिवसेनेत फूट पडली होती. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट शिवसेनेमध्ये असे दोन गट तयार झाले. यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल होत. त्या पाठोपाठ पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे (satyajeet tambe) यांच्या बरोबर पोट निवडणुकीत (Bypolls Elections) घडलेल्या घटनेवरून काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. म्हणून “महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्येच मतभेत आहेत का?” अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यातच आज शिवसेनेचे मुखपत्र असेल्या सामनातून असे सांगण्यात आल होत की “नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता, तर पुढचा पेच प्रसंग टाळता आला असता” अशी भूमिका सामानातून (Saamana) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thakre Group) मांडली होती. त्यावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आज शिवसेनेचे मुखपत्र असेलेल्या सामानातून (Saamana) काँग्रेस नेते नाना पाटोले (Nana patole) यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता . सामनात असे लिहिले होते की “नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता, तर पुढचा पेच प्रसंग टाळता आला असता” असे म्हणत काँग्रेसच्या नाना पाटोले यांना शिवसेना ठाकरे गटाकडून टोला लागवण्यात आला होता. तर आता यावर काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे मुख्य अतुल लोंढे यांनी सांगतलं की ” ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी किंवा घाईने हा निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा. काँग्रेस पक्षात एक निर्णय प्रक्रिया आहे. त्यानुसारच निर्णय घेतले जातात. पक्षाध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला की पक्षातील सर्वजण त्याचा मान राखतात व त्यानुसार त्याची अंमलबजावणीही केली जाते. सोनिया गांधी यांनी त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून पक्षहितासाठी घेतलेला तो निर्णय होता असे अतुल लोंढे यांनी सांगितलं आहे.

अतुल लोंढे यांनी पुढे सांगितलं की “नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकार समोर संकटाची मालिका सुरु झाली. या आरोपात काहीही अर्थ नाही. जर नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी कायम असते, तर पुढचा प्रसंग टळला असता. या ‘जर-तर’ ला राजकारणात काहीच अर्थच नसतो”. असे म्हणत अतुल लोंढे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतीळ पक्षांमध्ये देखील मतभेत होण्यास सुरुवात झाली आहे का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळ। Eknath Shinde | Exclusive Interview

Narendr Modi In Mumbai, पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई, अंधेरीतील वाहतुकीत बदल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss