spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“सुप्रीम कोर्टात सुद्धा इज्जत गेली”, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे यांच्यासोबत 20 आमदार नाहीत पण ते कोर्टाच्या माध्यमातून यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहे.

राज्यात उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जात सत्ता स्थापन केली. आता ठाकरे आणि शिंदे गटात असलेला सत्ता संघर्षाचा हा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. काल दुसऱ्यांदा सुप्रीम कोर्टाने ठाकरे- शिंदे गट यांच्यात असलेल्या वादावर निर्णय दिला आहे. याच निर्णयाच्या आधारावर नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. राणे कुटुंबीय जेव्हा संधी मिळेल तेव्हा नेहमीच उद्धव ठाकरेंवर टीका करतात.

हेही वाचा

पेप्सी इंडियाने केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर…

निलेश राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले, “उद्धव ठाकरे यांच्यासोबत 20 आमदार नाहीत पण ते कोर्टाच्या माध्यमातून यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांची उद्धव ठाकरेंना नेता मानायची इच्छा नाही ते त्याच पार्टीत राहून नेता का बदलू शकत नाही. बाळासाहेबांचे नाव पुरतं घालवलं या उद्धव ठाकरेंनी. सुप्रीम कोर्टात सुद्धा इज्जत गेली…”, असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे गटाने भाजपशी हात मिळवून सत्ता स्थापन केली. या सगळ्या घडामोडी लक्षात घेत निलेश राणेंनी हे ट्विट केलं असल्याचं स्पष्ट होतं. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल आहे.

Latest Posts

Don't Miss