spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शुल्लक कारणावरून मेट्रोमध्ये भांडण, भांडणाचे कारण ऐकून थक्क व्हाल.

ज्या कारणावरून मुलगी भांडत होती ते कारण आणखीनच मजेशीर आहे.

नवी दिल्ली – दिल्ली मेट्रोचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी आणि मुलगा भांडताना दिसत आहेत. मुलगी त्या मुलाला एकामागून एक कानाखाली मारताना दिसत आहे. ज्या कारणावरून मुलगी भांडत होती ते कारण आणखीनच मजेशीर आहे.

हेही वाचा:

‘कॉफी विथ करण’ मध्ये ‘या’ अभिनेत्रींनी करण ला केले ट्रोल

तरुण जोडप्यांमध्ये मारामारी आणि भांडणे सर्रास घडतात. जोपर्यंत ही भांडण बंद दाराच्या मागे होतात. तोपर्यंत कोणालाही कळत नाही. पण जेव्हा ही किंवा भांडण कॅमेऱ्यात कॅपचर होतात तेव्हा खरी समस्या निर्माण होते. असाच काहीसा प्रकार नुकताच दिल्ली मेट्रोमध्ये घडला. दिल्ली मेट्रोच्या प्रवासादरम्यान एका तरुण जोडप्यामध्ये वाद होऊन आपापसात भांडण होऊ लागले. यावेळी मेट्रोनेप्रवास करणाऱ्या लोकांनी या भांडणात पडण्यापेक्षा ती भांडण एन्जॉय करण्यात जास्त महत्वाचे समजले. यादरम्यान एका व्यक्तीनेव्हिडिओ बनवला आणि त्यानंतर हा व्हिडिओही ट्विट केला. मग काय, ट्विटरवर या जोडप्यासाठी कमेंट्सचा पाऊस पडला. कार्तिक नावाच्या व्यक्तीने या जोडप्यामधील भांडणाचा व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले, ४९ सेकंदांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये हेजोपडे ड्रेसच्या किमतीवरून आपापसात भांडताना दिसत होते. हा ड्रेस झारा या प्रसिद्ध स्टोअरमधून खरेदी केला होता. मुलीने झारास्टोअरमधून 1000 रुपये किमतीचा ड्रेस खरेदी केला होता, ज्याबद्दल मुलगा 150 रुपयांचा दिसतो असे म्हणताना ऐकू येत आहे. मुलाने असे सांगताच दोघांमध्ये भांडण सुरू झाली.

व्हिडिओमध्ये मुलगी एक अनेक वेळा त्या मुलाला कानाखाली मारताना दिसत आहे. दरम्यान, मुलगाही सतत काहीतरी बोलतांना ऐकूयेतो आणि एकदा तो मुलीला कानाखाली मारतानाही दिसतो आहे. दरम्यान, कोणत्याही मुलीला असा मुलगा मिळू नये, असे मुलीचेम्हणणे ऐकायला मिळते आहे. यावर मुलगाम्हणतो बाहेर ये आणि मला पुन्हा सांग.लोक या व्हिडिओवर अनेक प्रकारे मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत एका युजरने ट्विट केले आहे, मन मोडल्यावर एक साधी मुलगी सुद्धा गुंड बनू शकते. अशा एक ना अनेक मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss