आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana) दरवर्षी नवीन चित्रपटांची मेजवानी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. बालाजी टेलिफिल्म्सने (Balaji Telefilms) निर्मित केलेला २०१९ साली आलेला ड्रीम गर्ल चा २ रा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ड्रीम गर्ल हा चित्रपट खूप गाजला होता. ड्रीम गर्ल ने बॉक्स ऑफिस वर खूप यश मिळवले होते. या चित्रपटात आयुष्मान खुरणाने एका मुलीची भूमिका बजावली होती यामधे त्याने मुलीच्या आवाजात रेडिओ जॉकी म्हणून फोनवर संवाद साधला होता. अनोखी कथा आणि आयुष्मानच्या अभिनयामुळे तो चित्रपट खूप गाजला होता.
View this post on Instagram
या चित्रपटाचा २ पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यांचा पहिला टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ड्रीम गर्ल २ (Dream Girl 2) सर्वाधिक अपेक्षित विनोदी मनोरंजन (Comedy entertainment) करणारा चित्रपट ७ जुलै (July 7) रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या टिझर मध्ये आयुष्मान खुराना नवीन नॉटी फन व्हिडिओमध्ये, पूजा नावाच्या मुलीच्या रूपात इंडस्ट्रीतील सुपरस्टार शाहरुख खान सोबत संवाद साधताना दिसत आहे. या चित्रपटात आयुष्मान करम आणि एका मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.तसेच टीझरमध्ये शाहरुख खान फोनच्या दुसऱ्या बाजूस ‘पठाण’ म्हणून बोलत असतो, तो म्हणतो की तो पूजाला मिस करतो आणि त्याचा चित्रपट.. जवान लवकरच येतोय या बाबत अजुन फारशी माहिती मिळाली नाही.
आयुष्मान आणि शारुख खान (Shah Rukh Khan) या चित्रपटा निमित्ताने एकत्र दिसणार आहेत की काय?असा प्रश्न प्रेक्षकांना पडतोय. या चित्रपटाचा टिझर खुद आयुष्मानने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांना व्हॅलेंटाईन डेचे (Valentine’s Day) आश्चर्यकारक सरप्राइज दीले आहे. लवकरच प्रदर्शित होणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिवर(box office)किती यश मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हे ही वाचा :
Valentine’s day निमित्ताने रोहन प्रीत ने नेहा कक्कड ला दिले सुंदर गाणे भेट
BBC ला डॉक्युमेंट्री पडली महागात ? देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे