spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अखेर कोश्यारींच्या निरोपाची तारीख ठरली, शिवजयंती आधीच नवे राज्यपाल होणार विराजमान

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहीले आहेत. तसेच त्यांनी केलेल्या विधानांमुळे राज्यभरातून भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर संताप व्यक्त केला जात होता. याचे कारण म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केलं होता. म्हणून महाराष्ट्रातील जनतेच्या संतापाला राज्यपाल आणि सत्ताधार्यांना सामोरे जावे लागले. त्याच बरोबर राज्यपालांना हटवण्याची मागणीही करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी स्वतःहून आपला राजीनामा (Resign) राष्ट्रपतींकडे सादर केला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी (President) मंजूर केला असून त्यांच्याजागी रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर त्यांच्या शपथविधीची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या निरोपाची तारिक आता ठरली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा हस्तक्षेप केला. त्याचबरोबर राज्यपालांनी महापुरुषांवर देखील आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होत. त्यामुळे राज्यपाल हे अडचणीत सापडले होते. यानंतर राज्यपालांनी महापुरुषांवर अनेक वेळा आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं होत. त्यामुळे राज्यपाल अडचणीत सापडले होते. राज्यातील विरोधकांकडून आणि जनतेकडून राज्यपालांना हटवण्याची मागणीही करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी स्वतःहून त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला.

आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी रमेश बैस (Ramesh Bais) यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे. रमेश बैस (Ramesh Bais) यांची शपथ विधी हीयेत्या १६ ते १८ फेब्रुवारीमध्ये होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होता म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपूर्वीच म्हणजेच १९ फेब्रुवारीपूर्वीच राज्यपाल महाराष्ट्रातून जाणार असल्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

BBC कार्यालयारील आयकर विभागाच्या धाडीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, प्रसारमाध्यमांच्या कार्यालयावर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss