spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात निवडणुकीदरम्यान पाळला जाणार ड्राय डे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय

भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. कसबा (kasbah) आणि चिंचवडच्या (Chinchwad) निवडणूक प्रक्रियेमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी विषयी नागरिक तक्रार नोंदणी करू शकतात. या सुविधेमुळे अयोग्य बाबींवर तक्रार आणि कारवाई करणं सोपं होणार आहे. चिंचवड आणि कसबा पेठ जिल्यात विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे या प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ॲप वर सहज रित्या करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करावा .हा ॲप डाऊनलोड करुन सर्व सामान्य नागरिकांनी तक्रारींची नोंदणी करावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.

(Pune Bypoll election) चिंचवड आणि कसबा पेठ जिल्यात विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही या निवडणुकी दरम्यान कुठलाही व्यतेय येऊ नये तसेच हि निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडली पाहिजे यासाठी तेथील जिल्हाधिकारी डॉ. देशमुख (Dr. Deshmukh) यांनी या दरम्यानच्या कालावधीत आणि मतदार संघात सर्व किरकोळ मद्यपान विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

या कालावधीत निवडणूक परिसरातील सभोवातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन हे बंद राहतील.तसेच या कालावधीत ‘ड्राय डे’ (dry day) लागू असलेल्या क्षेत्रातील या विक्रेत्यांना देशी, विदेशी मद्याचा कोणत्याही प्रकारचा पुरवठा करता येणार नाही. निर्बंध असलेल्या क्षेत्रात कोणी मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यासह संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : 

BBC कार्यालयारील आयकर विभागाच्या धाडीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, प्रसारमाध्यमांच्या कार्यालयावर…

ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून श्री महावीर जैन हॉस्पिटलचा करण्यात आला गौरव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss