spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mahashivratri 2023, महाशिवरात्रनिमित्त बनवा स्पेशल थंडाई

महाशिवरात्री म्हणजे भोले शंकराची रात्र. या दिवशी देव शंकराची पूजा केली जाते. माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी शिवची पूजा करून पूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. यावर अनेक कथा प्रसिद्ध आहेत.

महाशिवरात्री म्हणजे भोले शंकराची रात्र. या दिवशी देव शंकराची पूजा केली जाते. माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी शिवची पूजा करून पूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. यावर अनेक कथा प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात की पृथ्वीची निर्मिती याच तारखेला झाली. तेव्हा मध्य रात्री शंकर भगवान यांनी रौद्र रूप धारण केले होते. म्हणून या दिवसाला महाशिवरात्र म्हणतात. विविध कार्यक्रमाचे नियोजन करून ही रात्र जागवली जाते तसेच यादिवशी थंडाई बनवली जाते, कारण की या दिवशी पूर्ण दिवस उपवास केला जातो. थंडाईच्या सेवनाने शरीर थंड राहते. यानियमित्ताने शरीरात पौष्टिक घटक जातात. भारतातील थंडाई हे पेय एक पारंपारिक पेय आहे. म्हणून हि थंडाई कशी बनवली जाते हे आपण बघुयात

साहित्य

१कप दुध
१/२ कप साखर
२ टी स्पून गुलकंद
१/२ लिटर पाणी
१ टी स्पून बदाम
१ टी स्पून कलिंगडचे बी
१ टी स्पून मिरे
१/२ टी स्पून खसखस
१/२ टी स्पून बडीशेप
१ टी स्पून वेलचीपूड

कृती –

  • सर्वात प्रथम साखर व अर्धा कप पाणी मिक्स करून बाजूला ठेवा.
  • एका भांड्यात १ कप पाणी घेवून त्यामध्ये बदाम, कलिंगडचे बी, मिरे, खसखस, बडीशेप (Fennel) १/२ ते २ तास भिजत ठेव
  • मग हे मिश्रण चांगले भिजले की त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. गरज असेल तर अजून थोडे पाणी घालून वाटा. मग त्यातील गाळ गाळून घ्या. म्हणजे गाळून फक्त अर्क भांड्यात जमा होईल.

  • मग भांड्यातील अर्कात दुध (milk), साखर (sugar), रोझ वॉटर (Rose water) घालून मिस्क करून घ्या. मिक्स केल्यावर वेलचीपूड (cardamom powder) घालून फ्रीजमध्ये १-२ तास छान थंड करायला ठेवा. मग थंड थंड थंडाई सर्व्ह करा.

हे ही वाचा : 

अखेर कोश्यारींच्या निरोपाची तारीख ठरली, शिवजयंती आधीच नवे राज्यपाल होणार विराजमान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss