spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mahashivratri 2023, महाशिवरात्री दिनानिमित्ताने जाणून घ्या शंकराच्या आवडत्या बेलाचे महत्व

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी हिंदू समाजात महाशिवरात्र (Mahashivratri 2023) म्हणून पाळली जाते. या दिवशी शिवाची (lord shiva ) पूजा, आराधना करून पूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. या दिवशी मोठं मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शिवभक्त संपूर्ण रात्र जागून शिवाची आराधना करत असतात. महाशिवरात्री बेलाच्या पानांनी भगवान शंकर यांची पूजा केली जाते.

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी हिंदू समाजात महाशिवरात्र (Mahashivratri 2023) म्हणून पाळली जाते. या दिवशी शिवाची (lord shiva ) पूजा, आराधना करून पूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. या दिवशी मोठं मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शिवभक्त संपूर्ण रात्र जागून शिवाची आराधना करत असतात. महाशिवरात्री बेलाच्या पानांनी भगवान शंकर यांची पूजा केली जाते. या बेलाच्या पानाचे (Bael leave) त्या दिवशी खूप महत्व असते. बेलाचे पान हे भगवान शंकर (Lord Shankar) यांना आवडायचे असे म्हंटले जाते. पण तुम्हाला माहित आहे का या बेल्चच्या पानाचे दैनंदिन जीवनात खूप फायदे आहेत. बेलाचे पान आरोग्यास खूप लाभाकरारक असते. याचे सेवन केल्याने निरोगी जीवन जगता येते. तर या महाशिवरात्री निमित्ताने आपण बेलाच्या पानाचे सेवन करूयात आणि याचे फायदे देखील समजून घेऊयात.

  • बेलाचे पान वाहून भगवान शंकराची पूजा केली जाते, जसे बेलाच्या पानाचे महत्व आहे तसेच त्याचे फळ देखील तितकेच गुणकारी आहे.
  • बेलाचे पान वाटून त्याचा रस काढून सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने रक्तदाब (blood pressure) नियंत्रित राहतो, हृदयाचे कोणतेही रोग होत नाहीत.
  • बेलाचे फळ प्रामुख्याने उन्हाळ्यात झाले जाते, हे नैसर्गिक रित्या थंड असते त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
  • तुमचे पोट दुखत असेल तर रोज एक बेलाचे फळ खा हे खाल्याने पोटाचे दुखणे(Abdominal pain) कमी होते.

  • तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची (hemoglobin) कमी असेल तर बेलाचे फळ व पान दोन्ही गुणकारी आहेत याचे नियमित सेवन केल्याने शरीरात रक्ताची वाढ होते.
  • पोटात अल्सर, (ulcer) तसेच गर्भाशयाला सूज(Swelling of the uterus) येणे, अल्सर पोटात पसरणे यामुळे तोंडाला फोड येतात. या समस्येमध्ये बेलाचा गर उकळून त्याच्या गुळण्या केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

हे ही वाचा : 

अखेर कोश्यारींच्या निरोपाची तारीख ठरली, शिवजयंती आधीच नवे राज्यपाल होणार विराजमान

IND vs WI, भारताच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज एक मोठे आव्हान,वेस्ट इंडिजने घेतला फलंदाजीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss