spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘मी पुन्हा येईन’ या राजकीय नाट्याचा ट्रेलर रिलीज

राजकीय घडामोडी एका विनोदी ढंगात घेऊन येणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’ या प्लानेट मराठीवरील अरविंद जगताप लिखित आणि दिग्दर्शित वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

मी पुन्हा येईन हे वाक्य ऐकलं की महाराष्ट्रातील काही महत्वाच्या राजकीय घडामोडी आपल्याला आठवतात आणि अशाच काही राजकीय घडामोडी एका विनोदी ढंगात घेऊन येणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’ या प्लानेट मराठीवरील अरविंद जगताप लिखित आणि दिग्दर्शित वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

या वेब सिरीजमधील कलाकार, विनोदी ढंगात मांडलेला विषय आणि या वेब सिरीजमधील संवादांमुळे लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या वेब सीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दीप्ती क्षीरसागर असे दमदार कलाकार विविध भूमिका साकारताना दिसत आहेत.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’आम्ही नेहमीच आमच्या ओटीटीवर उत्तमोत्तम आणि नवीन आशय देण्याच्या प्रयत्न केला आहोत. ‘मी पुन्हा येईन’ ही मराठी वेबविश्वासाठी एक वेगळी संकल्पना आहे आणि मला या गोष्टींचा विशेष आनंद आहे की, ही मनोरंजनात्मक सीरीज प्रेक्षकांना प्लॅनेट मराठीवर पाहाता येणार आहे.’‘

‘मी पुन्हा येईन’ बद्दल लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, ‘’प्रेक्षकांची प्रतिक्रिया ही सर्वोत्तम प्रतिक्रिया असते. आता ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात, हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. बहुमतासाठी पक्षाची चाललेली धडपड, आमदारांची पळवापळवी, कारस्थाने सत्तेसाठी कोणत्या थराला जातात, याचे गंमतीशीर चित्रण ‘मी पुन्हा येईन’मध्ये पाहायला मिळणार आहे. राजकारणाचे काही खरे नाही, हेच खरे आहे, हे हसतखेळत सांगणारी ही सीरीज आहे. मला खात्री आहे, हे कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईलच याशिवाय यातील मनोरंजक ट्विस्ट्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतील.’’

पहा ट्रेलर:

Latest Posts

Don't Miss