spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महेश आहेर मारहाण प्रकरणी, जितेंद्र आव्हाडांसह सात जणांवर गुन्हा दाखल

मागील काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कालच जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जिवेमारण्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर आली होती. या संदर्भात एक ऑडिओ व्हायरल झाला होता. या ऑडिओमध्ये ठाणे महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांचा उल्लेख केला जात होता. पण यानंतर काही जणांनी सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावरच हल्ला केला होता. या प्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि इतर सात समर्थकांविरोधात नौपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलगी आणि जावयावर गोळी झाडण्याची धमकी देण्यात आलीय. धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. आणि मुख्य म्हणजे या प्रकरणात बाबाजीचे नाव आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. स्पेनमध्ये मारेकरी तयार ठेवल्याचे रिकॉर्डींगमध्ये उल्लेख आहे. तसेच या ऑडिओ मध्ये ठाणे महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त महेश आहेर यांचा देखील उल्लेख या ऑडिओमध्ये केला गेला होता. यानंतर काल जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी महेश आहेर यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि इतर सात समर्थकांविरोधात नौपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी जितेंद्र आव्हाड याना जीवे मारण्याची ऑडिओ क्लीप व्हायरल होताच महेश आहेर यांना ताब्यात घेतले होते. त्याचवेळी ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आहेर यांना मारहाण केली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३५३, ३०७, ३३२, ५०६(२), १४३ सह आव्हाडांसह सात जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

Mahashivratri 2023, यंदाच्या महाशिवरात्री दिनाची पूजा विधी आणि मुहूर्त घ्या जाणून

Mahashivratri 2023, महाशिवरात्री दिनानिमित्ताने जाणून घ्या शंकराच्या आवडत्या बेलाचे महत्व

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss