Wednesday, September 25, 2024

Latest Posts

आरे कारशेड वरील बंदी मुख्यमंत्र्यांनी हटवली, आता मेट्रोचा मार्ग मोकळा

मुंबई : मुंबई मेट्रोचा आरे येथील कारशेड मार्ग मोकळा झालेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कारशेडवर घातलेली बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवलेली असून आता कारशेड अरे येथेच उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मेट्रो कारशेडचा प्रकल्प हा स्थगित करण्यात आला होता त्यामुळे मागच्या अडीच वर्षात मेट्रो कार्ड शेडचे काम हे थांबले होते. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरे कारशेडला परवानगी दिली.  शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर हा प्रकल्प सुरू होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे आता मुंबईतील आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला गती येणार असल्याचे सांगितले जाते. परंतु सरकारने आरे कारशेडवरील बंदी उठवली असल्याने मुंबईकर आणि पर्यावरणप्रेमी कडून अधिक आक्रमक आंदोलन केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात सत्तांतरानंतर महाविकास आघाडीने आरे मेट्रो कार्डच्या बांधकामाला स्थगिती देत कांजुर येथीलइतर इतर जागेसह  पर्यायावर विचार सुरू केला होता. कांजूर येथील जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ठत चालू आहे. एकनाथ शिंदे व भाजपाच्या सत्ता स्थापनेनंतर मेट्रो कार शेअरचा विषयाला आता वेगळे वळण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : 

मुंबईत कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा संसर्ग, ४ रुग्ण गंभीर

आरे कारशेडच्या निर्णयावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

आदित्य ठाकरे हे त्यांच्या संवादयात्रेवर असताना मुंबईतील आरे कारशेडच्या निर्णयावर भाष्य केले, ” आरे कारशेडचा निर्णय आम्ही मुंबईकरांसाठी घेतला होता. तुम्हाला जो राग काढायचा आहे तो आमच्यावर काढा मुंबईकरांना याचा त्रास नको”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 2019 मध्ये आरे मध्ये कार्डशिट उभारण्यासाठी वृक्षतोड सुरू केली होती त्यावेळेस स्थानिक आदिवासींसह पर्यावरण प्रेमींकडून रात्रभर आंदोलन करून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सेनेतील बंड व जुन्या आठवणींना मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिला उजाळा

Latest Posts

Don't Miss