spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

COLLEGE FESTIVAL, TOOFAN मध्ये रंगल्या विद्यार्थींनी

नुकताच काला घोडा (Kala Ghoda) फेस्टिवल हा संपन्न झाला आहे. मुंबईसह आजू बाजूच्या परिसरात सध्या अनेक फेस्टिवल्स रंगत आहेत.

नुकताच काला घोडा (Kala Ghoda) फेस्टिवल हा संपन्न झाला आहे. मुंबईसह आजू बाजूच्या परिसरात सध्या अनेक फेस्टिवल्स रंगत आहेत. या फेस्टिवल्स मुळे तरुणाईला अक्षरशः उधाण आले होते. असाच तरुणाईचा उत्साह आज दक्षिण मुंबईतील एका कॉलेजमध्ये दिसून आला आहे. अर्थात ते कॉलेज म्हणजे मुंबईतील गावंदेवी परिसरातील मारवाडी संमेलन संचालित सीताराम देवरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि बी. एम रुईया गर्ल्स कॉलेज आहे (Marwadi Sammelan’s Sitaram Deora Institute of Management Studies And B.M Ruia Girls College Affiliated to SNDT University, Mumbai). या कॉलेजने ‘TOOFAN’ फेस्टिवलचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमातील विशेष गोष्ट म्हणजे ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra) हे वेब पोर्टल मीडिया पार्टनर म्हणून सहभागी झाले. त्यामुळे या फेस्टिव्हलची प्रत्येक माहिती तुम्हाला आमच्या यू ट्यूब चॅनेल आणि वेबसाईट वर पाहता येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

आज दि. १६ फेब्रुवारी २०२३ आणि उद्या दि. १७ फेब्रुवारी २०२३ असे दोन दिवसांसाठी विद्यार्थिनींनी TOOFAN फेस्टिवलचे आयोजन केले आहे. आज या फेस्टिवलचा पहिला दिवस संपन्न झाला आहे. यामध्ये ग्रुप डान्स, शार्क टॅंक, नो फायर कूकिंग आणि डिबेट अश्या ४ कार्यक्रमांचे आयोजन हे करण्यात आले होते. ग्रुप डान्स मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कला अनोख्या पद्धतींने सादर केल्या आहेत. तसेच शार्क टॅंक या स्पर्धेचे आयोजन केले. यामध्ये स्पर्धकांना त्यांचे विचार आणि नवीन प्रकल्प मांडायचे होते. तर डिबेट हि स्पर्धा देखील दिमाखात रंगली होती. यामध्ये विद्यार्थ्यांना ‘सोशल मिडिया वरदान की शाप’ हा विषय देण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचं स्पष्ट मत यामध्ये मांडले आहे. तर शेवटची स्पर्धा म्हणजे ‘नो फायर कुकिंग’. या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते. यामध्ये अनेक विद्यार्थींनी मोठ्या प्रमाणात सहभाग हा घेतला होता आणि वेगेवेगळ्या पद्धतींचे पदार्थ बनवण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी कोणत्याही प्रकारच्या गॅसचा वापर न करता अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले होते. विशेष म्हणजे या मध्ये मुलीप्रमाणे मुलांनी देखील आवडीने सहभाग हा घेतला होता आणि उत्सहाने ते पदार्थ बनवत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

 महाविद्यालयातर्फे ‘तूफान’ हा परफॉर्मिंग आर्ट्सचा भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे. संस्कृतीचा उत्सव असण्याबरोबरच, तुफान हा शैक्षणिक आणि अभ्यासेतर उपक्रमांचा कळस आहे. सहभागींचे एकंदर व्यक्तिमत्व वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. हा एक मनोरंजक ब्रेन टीझर आहे जो SDIMS च्या विद्यार्थ्यांनी सहकार्याने डिझाइन केलेला आणि होस्ट केला आहे. सीताराम देवरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही एक विद्यार्थी-केंद्रित आणि विद्यार्थी-केंद्रित संस्था आहे, ज्याची स्थापना मारवाडी संमेलनाच्या संचलित गटाने २०१२ मध्ये केली. SDIMS विद्यार्थ्यांना त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली साधने प्रदान करण्याचा प्रयत्न करते.

हे ही वाचा:

SDIMS College मध्ये ‘विद्यार्थिनींनी जल्लोषात साजरा केला ‘TOOFAN ‘ फेस्टिवल

Collage Festival, ‘अंतरंग’ फेस्टिवलमध्ये रंगले कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss