spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Breaking, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

आज महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून शिवसेनेमध्ये दोन गट तयार झाले होते. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट असे हे दोन गट तयार झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना या नावावर आणि चिन्हावर हक्क दाखवला होता. त्यानंतर हे प्रकरण निवडणुजक आयोगाकडे गेला होत. निवडणूक आयोगाच्या न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली होती. तर आयोगाने निकाल हा राखून ठेवला होता. तर आज निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आले आहे.

आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. हे प्रकरणानंतर निवडणूक आयोगाकडे गेल. यानंतर मागील आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगात 1सुनावणी सुरु होती. केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी आमच्याकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी असल्याचा युक्तिवाद केला होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वकिलांनी पक्षाची घटना, राष्ट्रीय कार्यकारणी, प्रतिनिधी सभा या बद्दलचे मुद्दे मांडत जोरदार युक्तिवाद केला होता. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांकडून लिखित उत्तरे मागितले होते. पण ठाकरे गटाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि निवडणूक आयोगाने आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या विचारांचा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. हा बहुमताचा विजय आहे. आमचा सरकार घटनेच्या आधारावर चालत. ना निर्णय मेरीटवर मिळालेला निर्णय आहे. माझ्यासोबत असलेले सर्व आमदार खासदार यांचा सर्वांचा विजय आहे”. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल आहे.

हे ही वाचा : 

गिरीश बापट यांच्या भाजप प्रचारासंदर्भात शरद पवार यांच सूचक विधान , त्यांची प्रकृती पाहता….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss