spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

निवडणूक आयोगाच्या निकालांनंतर ठाकरे गटाकडून संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे.

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला आणि काढता पाय घेतला. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. तेव्हापासून या दोन्ही गटांमध्ये वाद हे सुरू होते. परंतु आज अखेर निवडणूक आयोगाने हा निकाल लावला आहे आणि निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिले आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी त्यांची संतप्त प्रतिक्रिया ही आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खूप यांचा उल्लेख केला आहे हा खोक्यांचा विजय आहे अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. राज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे कोकण दौऱ्यावर आहेत निवडणूक सत्यमेव जयते ऐवजी आता अस सत्यमेव जयते असं करावं. या संपूर्ण प्रकरणात खोक्यांचा कुठपर्यंत वापर झाला आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की निवडणूक आयोगाने आता लोकांचा विश्वासही गमावला आहे . सहाय्यत्त संस्था कशा प्रकारे संपवल्या जात आहेत. हे आता याच्यातून दिसून आले आहेत. पाण्यासारखा पैसा वाहिला आणि हा पैसा कुठे गेला हे लोकांनी पाहिले आहे. शिवसेनाप्रमुख, शिवसैनिकांचा त्यागातून पक्ष उभा केला तो पक्ष ४० बाजारबुणगे विकत घेतात आणि त्याचे नोंद होणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातून शिवसेना संपवावी यासाठी सगळ्या डाव रचला जात आहे असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत लोकांमधून पुन्हा एकदा शिवसेना उभी करणार आहोत असा निर्धार संजय राऊत यांनी यावेळेस व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : 

Breaking, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss