spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shivjayanti 2023, जाणून घ्या कर्तृत्ववान शिवरायांच्या काही खास गोष्टी

   शिवाजी (shivaji maharaj) महाराजांवर आपल्या सगळ्यांचेच प्रेम आहे. येत्या १९ तारखेला शिवजी महाराजांची जयंती आहे. महाराष्ट्रातील (maharashtra) लोक ही जयंती अगदी एका सणाप्रमाणे साजरी करतात.

शिवाजी (shivaji maharaj) महाराजांवर आपल्या सगळ्यांचेच प्रेम आहे. येत्या १९ तारखेला शिवजी महाराजांची जयंती आहे. महाराष्ट्रातील (maharashtra) लोक ही जयंती अगदी एका सणाप्रमाणे साजरी करतात. पण तुम्हाला माहित आहे का शिवजी महाराजही तितकेच प्रेमळ होते. कोणत्याही राजाला राजा होण्यासाठी काही खास गुण असावे लागतात जे महाराजांमध्ये होते. महाराज काही खास गुणांमुळे एक कर्तृत्ववान राजे होते.

 

शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर (lawns) व रयतेवर खूप प्रेम केले. जाती पाती नष्ट करुन सर्वांना एकसमान वागणूक दिली. तसेच प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारबाजी करणाऱ्या धारकऱ्यांना ‘मानकरी’ भाला फेकणाऱ्यानिष्णात (soldire) सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी दिली जायची. जीव धोक्यात घालून गड चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे.

 

आपल्यापेक्षा प्रबळ शत्रुला (enemy) शिवाजी महाराज कधीही घाबरले नाही. भय हा शब्द महाराजांच्या ध्यानी-मनीही नव्हता. महाराजांची कार्यपद्धती नेमकी असायची. एखादी मोहीम आखल्यानंतर गड उतार झाल्यापासून ते पुन्हा गडावर येईपर्यंत कशी कामे करायची, याचे व्यवस्थापन चोख असायचे. नियोजन करणे, माहिती गोळा करणे, जबाबदाऱ्या निश्चित करणे, यामुळे शिवाजी महाराजांना मोठे यश मिळाले. जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची (swarajya) स्थापना केली.

हे ही वाचा :

Breaking, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

 

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

 

निवडणूक आयोगाच्या निकालांनंतर ठाकरे गटाकडून संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss