spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Amit Shah आज पुणे दौऱ्यावर, अनेक कार्यक्रमांना लावणार हजेरी

आज दि १८ फेब्रुवारी रोजी अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आहेत. सध्या पुण्यात पोट निवडणूकांची रणधुमाळी ही सुरु आहे. पुण्यातील कसबा (Kasba ByPoll Election) आणि चिंचवड पोटनिवडणुकीची (Chinchwad by-election) चर्चा ही राज्यभर आहे.

आज दि १८ फेब्रुवारी रोजी अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आहेत. सध्या पुण्यात पोट निवडणूकांची रणधुमाळी ही सुरु आहे. पुण्यातील कसबा (Kasba ByPoll Election) आणि चिंचवड पोटनिवडणुकीची (Chinchwad by-election) चर्चा ही राज्यभर आहे. तर त्यातच या पोटनिवडणुकीसाठी आज देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) थेट मैदानात उतरणार आहेत. गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस पुणे (Pune News) दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रमांना देखील उपस्थित राहणार आहे.

दरम्यान अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मोठे मोठे बॅनर्सदेखील लावण्यात आले आहे. ओंकारेश्वर मंदिराचं ते दर्शन घेणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कसा असेल अमित शहांचा पुणे दौरा?

  • आज दि. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २. ३५ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं पुणे विमानतळावर आगमन होईल.
  • २. ५० वाजता सिंहगड कॉलेजच्या हेलिपॅडजवळ अमित शहांचा ताफा पोहोचेल.
  • पुढे ३ वाजता सहकार परिषद, दैनिक सकाळ, हॉटेल टिपटॉप, वाकड येथे ते हजेरी लावणार आहेत.
  • ५ वाजता काश्मीरमध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत जे डब्ल्यू मॅरिएटमध्ये संवाद साधणार आहे.
  • ८ वाजता मोदी @20 पुस्तक प्रकाशन शहांच्या हस्ते होणार आहे.
  • त्यानंतर ९ वाजता ते ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घेणार आहे.
  • रात्री उशिरा खासदार गिरीश बापट यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत.
  • उद्या दि. १९ तारखेला बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या एका टप्प्याचं लोकार्पण करणार आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान ‘प्रोटोकॉल’प्रमाणे बंदोबस्ताच्या नियोजनासाठी दिल्लीतील अधिकारी पोहोचले आहेत. गृह मंत्र्यांचा दौरा पूर्ण होईपर्यंत दिल्लीतील या विशेष अधिकाऱ्यांचे पथक दशहतवादविरोधी पथकासह दिल्ली आणि मुंबईतून पोलिस अधीक्षकांशी समन्वय ठेवून असणार आहेत. त्याच बरोबर कोल्हापूर महापालिकेने केलेल्या विविध कामांची महापालिका प्रशासकांनी अधिकाऱ्यां समवेत पाहणी केली. प्रशासकांनी रस्त्यांची डागडुजी, फांद्यांचे कटिंग, चॅनेल स्वच्छता, रंगरंगोटी, स्टेज व्यवस्थेचीही पाहणी केली. पंचगंगा घाटावर सुमंगलम लोकोत्सवानिमित्त महाआरती होत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकजण उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने उभारलेल्या व्यासपीठाची देखील पाहणी केली आहे.

हे ही वाचा : 

निवडणूक आगोच्या निकालावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची प्रतिक्रिया

Mahashivrtari 2023, महाशिवरात्री निम्मित द्या खास शुभेच्छा… !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss