spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आज कोल्हापुरात अमित शाह काय बोलणार ? उत्सुकता शिगेला, मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते मंडळी राहणार उपस्थित

आज अमित शाह हे कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. या निम्मिताने कोल्हापुरात आज मंत्र्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत.

आज अमित शाह हे कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. या निम्मिताने कोल्हापुरात आज मंत्र्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत म्हणून कोल्हापूरला अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरात तगडा बंदोबस्त हा करण्यात आला आहे.

आज कोल्हापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) हे असणार आहेत. अमित शाह हे दौऱ्यावर येणार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ), उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) देखील आज कोल्हापुरात (Kolhapur) असणार आहेत. त्यानिमित्ताने आज पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे.

अमित शाह यांचा दौरा कार्यक्रम –

  • दुपारी १. ३० वाजता अमित शाह हे कोल्हापूर विमानतळ पोहचतील.
  • त्यानंतर ते अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जातील.
  • दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आणि नंतर दसरा चौकात राजर्षी
  • छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण कार्यक्रमास उपस्थिती असेल.
  • त्यानंतर ते हॉटेल पंचशीलकडे रवाना होतील.
  • दुपारी सव्वा तीन वाजता दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाला हजेरी लावतील.
  • सायंकाळी ५ वाजता भाजप कार्यालय, नागाळा पार्ककडे प्रयाण करतील.
  • सायंकाळी ५ ते ६.३० या कालावधीत भाजपच्या विजय संकल्प रॅली होणार आहे. त्यानंतर त्यांचे हॉटेल पॅव्हेलियन येथे आगमन होईल. या ठिकाणी बैठक होईल.
  • त्यानंतर कोल्हापूर विमानतळावरून रात्री ९.३० वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.

एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Kolhapur) आज कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोल्हापुरात आहेत.

हे ही वाचा : 

Shivjayanti 2023, शिवजयंती निम्मिताने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिवरायांच्या जन्मभूमी झाले नतमस्तक

शिवसेनेचे नाव आणि पक्ष मिळवण्यासाठी २००० कोटींचा सौदा, संजय राऊतांच्या आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss