spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठं आणि ऐतिहासिक थीम पार्क असणार, अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांच्या हस्ते पुण्यातील शिवसृष्टीच्या (shivsrushti pune) पहिल्या टप्प्याचं उद्घाटन रविवारी झाले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात आलेली ही शिवसृष्टी चार टप्प्यात उभारण्यात येत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांच्या हस्ते पुण्यातील शिवसृष्टीच्या (shivsrushti pune) पहिल्या टप्प्याचं उद्घाटन रविवारी झाले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात आलेली ही शिवसृष्टी चार टप्प्यात उभारण्यात येत आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण शिवजयंतीनिमित्त रविवारी करण्यात आले. या उदघाटनादरम्यान अमित शाह ने शिवजयंती निमित्ताने शिवाजी महाराजांवर प्रेरणादायी भाषण केले. या भाषणातून त्यांनी विविध योजनांबद्दल सांगितले तसेच जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमित शाह म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन एका राजाचं जीवन नाहीये. तर हा एक विचार आहे. हा विचार मानणारे अनेक लोक हे शिवसृष्टीचं काम पुढे नेतील. या कामात हजारो लोक सामील होतील. ही शिवसृष्टी आशिया खंडातील (Asia) सर्वात मोठं आणि ऐतिहासिक थीम पार्क (Theme park) असणार आहे, असे विश्वासू वक्तव्य जनतेला केले. छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा संघर्ष हा स्वराज्यासाठी होता. सत्ता लालसेसाठी त्यांचा संघर्ष नव्हता, असं देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सद्याच्या राजकारणाला उद्देशून म्हणाले.

अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यात आलं. त्यांनतर शिवाजी महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले शिवाजी महाराज हे साहसी राजे होते. ते स्वत: लढाईत पुढे असायचे, लढाईचे नेतृत्व करायचे. आपल्या इतिहासात फारच थोडे राजे असे आहेत की जे स्वत: फ्रंटवर असायचे. त्यापैकी शिवाजी महाराजहे एक आहेत. त्यांच्या आयुष्यातील अशा कितीतरी लढाया आहेत. ज्या त्यांनी स्वत: लढल्या आहेत. एवढा शूरवीर राजा या धरतीवर झाला नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

हे ही वाचा :

शिंदे गटाचं ‘सोशल मीडिया स्ट्राईक’, प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण ठेवून व्यक्त केला आनंद

Uddhav Thackeray यांनी बोलावली तातडीची बैठक, काय असेल पुढील भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss