spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Somvati Amavasya 2023, वर्षातील पहिली सोमवती अमावस्या, जाणून घ्या मुहूर्त

उद्या दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी सोमवती अमावस्याआहे. उद्या म्हणजेच सोमवारी, वर्षातील पहिली सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा नदी किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य आणि दानही केले जाते.

उद्या दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी सोमवती अमावस्याआहे. उद्या म्हणजेच सोमवारी, वर्षातील पहिली सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा नदी किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य आणि दानही केले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन हा शेवटचा महिना असल्याने या महिन्यात मंत्रोच्चार आणि तपस्या यांचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करतात. या तिथीचा स्वामी पितृ मानला जातो. या दिवशी स्नान केल्याने पितृदोष, कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. पितरांच्या कृपेने कुटुंबात सुख-समृद्धी येते.

२०२३ मध्ये तीन सोमवती अमावस्येचे योग असतील,
पहिला योग २० फेब्रुवारीला,
दुसरा योग १७ जुलैला,
तिसरा योग १३ नोव्हेंबरला असेल.

फाल्गुन सोमवती अमावस्या ची शुभ

तिथी – १९ फेब्रुवारी २०२३ , वेळ – ०४.१८ सायंकाळ
तारीख समाप्त – २० फेब्रुवारी २०२३ , वेळ – १२.३५ सायंकाळ
दान मुहूर्त – २० फेब्रुवारी सकाळी ०७.०० सकाळी – ०८.२५ सकाळी
पूजा मुहूर्त – २० फेब्रुवारी २०२३ – 08.25 am पूजा – 01501.
शिव मुहूर्त. – २० फेब्रुवारी २०२३ सकाळी ११ .०३ ते २१ फेब्रुवारी २०२३ सकाळी ०६ .५७ पर्यंत

अमावस्येला करा तर्पण :

सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र स्नान आणि दान, तर्पण इत्यादीचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी स्नान, तर्पण वगैरे अवश्य करावे. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि पितर प्रसन्न होतात, असे मानले जाते. तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व दुःखांचा नाश होतो. याने साधकांना अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते. पिंपळाच्या झाडाच्या पूजेलाही या दिवशी विशेष महत्त्व आहे. तसेच तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावस्येचे व्रत करून सुख आणि समृद्धीची कामना करू शकता.

हे ही वाचा : 

Nagpur duronto express मधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोजावे लागणार जास्त पैसे, १५ जूनपासून ऑनलाईन रिझर्वेशन होणार बंद

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या मालमत्तेचे काय ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss