spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shivjayanti 2023, दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी करायची, एकनाथ शिंदे

काल दि १९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र शिवजयंती हि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच यंदा पहिल्यांदा आग्रा किल्ल्यावर दिवाण-ए-आममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

काल दि १९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र शिवजयंती हि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच यंदा पहिल्यांदा आग्रा किल्ल्यावर दिवाण-ए-आममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. “दरवर्षी शिवजयंती (Shiv Jayanti) आग्रा किल्ल्यावरच (Agra Fort) साजरी करायची,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केलं.

काल दि १९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. कोरोनामुळे दोन वर्ष हा उत्सव साजरा करण्यात आला न्हवता. परंतु यंदा मोठ्या जल्लोषात ही जयंती साजरी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर आर पाटील फाऊंडेशनच्या वतीने आग्र्यातील लाल किल्ल्यावर (Red Fort) शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवासाठी हजारो शिवप्रेमी जमले होते. या खास कार्यक्रमासाठी औरंगाबादहून कार्यकर्त्यांची स्पेशल ट्रेन रवाना झाली होती. तसेच यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “छत्रपतींचे कार्य कोणालाही विसरता येणार नाही. गड-किल्ल्यांवर गेल्यावर कळतं काय मॅनेजमेन्ट होतं. छत्रपती शिवाजी महाराज ही एक दैवीशक्ती आहे. त्याकाळी काय परिस्थिती असेल हा विचार करुन आजही अंगावर काटा येतो. औरंगजेबाची फौज मोठी होती. म्हणून आपल्या गीतात म्हटलं आहे दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा.” “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जात असून यापुढे दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी केली जाईल,” अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “ज्या लाल किल्ल्यात औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करुन नजरकैदेत टाकले, ज्या दिवाण-ए-खास मध्ये शिवछत्रपतींना बोलावून त्यांचा अपमान केला, त्याच ठिकाणी शिवजयंतीचा हा सोहळा साजरा होणे ही माझ्या आयुष्यातील रोमांचकारी क्षण आहे. आज बदला घ्यायची संधी मिळाली. अनेक शिवभक्त या ठिकाणी आले आहेत. ही शिवजयंती सोनेरी अक्षरात लिहिली जाईल.”

हे ही वाचा :

एकनाथ शिंदेनी केला मास्टरप्लॅन, सर्व आमदारांसह होणार अयोध्येला रवाना

संजय राऊत यांची मानसिक स्थिती बिघडली आहे, नरेश म्हस्केचा हल्लबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss