spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुखपद मिळणार का, काय असणार बैठकीनंतरचा निर्णय

महाराष्ट्रातील सत्तांतराचा चालू असणारे राजकारण हे सगळ्यांना माहित आहे. आता शिवसेना कोणाची हा वाद चांगला पेटला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्रातील सत्तांतराचा चालू असणारे राजकारण हे सगळ्यांना माहित आहे. आता शिवसेना कोणाची हा वाद चांगला पेटला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षाचे (Shiv Sena Party) सर्व अधिकार नक्की कोणाकडे जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतले आहे. तसेच इतरही शिवसेना कार्यालयावर दावा करण्यात येणार आहे. विधानपरिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडील पदही शिंदे गट काढून घेण्याच्या तयारीत आहे. तसेच पुढील रणनीती बद्दल चर्चा करण्यासाठी शिंदे गटातील आमदारांची बैठक आज बसणार आहे. या बैठकीत नक्की काय निर्णय घेण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

निवडणूक आयोगाच्या ( Election Commission) निर्णयानंतर शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचे झाले आहे. यामुळे आता शिंदे गटाचा व्हिप (Whip) ठाकरे गटाच्या आमदार (member of the legislative assemble), खासदारांना (Members of Parliament) लागू होणार की काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील या सत्तासंघर्षाने प्रत्येकाला कोड्यात टाकले आहे. कायद्याच्या जोरावर हुकूमशाही चालवली जात आहे. त्याचबरोबर शिंदे गटाने शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांना व्हिप जारी करण्याचे निर्णय घेतले आहे. शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांनी सभागृहात आपली उपस्थिती लावावी असे वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. प्रतोद भरत गोगावले त्याबद्दलचा व्हिप जारी करणार आहेत.

विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी शिंदे गट आणि ठाकरे गट यांची बैठक होणार आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे आमदार, खासदार उपस्थित असणार आहेत. मुंबई मधील हॉटेल ताज येथे सायंकाळी ७.३० वाजता या बैठकीचं आयोजन केले जाणार असून मुख्यमंत्री व शिवसेना गटाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हेही बैठकीला आपली उपस्थिती लावणार आहेत . विशेष म्हणजे या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यात, शिवसेना पक्षप्रमुखपदी एकनाथ शिंदेंना बसवण्यात येण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे अशी चर्चा केली जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे पद स्वीकारणार आहेत का? या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर या सर्व गोष्टींचा खुलासा केला जाणार आहे.

हे ही वाचा :

शिवजयंती साजरी करण्यावरून दिल्लीत JNU मध्ये राडा

Shivjayanti 2023, दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी करायची, एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss