spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आनंदाची बातमी ! यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार

मुंबई : गेले दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्यामुळे सणांवर निर्बंध घालण्यात येत होते. पण यंदाच्या वर्षी निर्बंध मुक्त सण साजरे करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम हे सण उत्सवात झाले पाहिजे अशी चर्चा बैठकीत झाली होती. कायदा व सुव्यवस्था राखून हे उत्सव झाले पाहिजे अशा सूचना राज्याकडून पोलीस व जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये गणेश उत्सव हा साधेपणात साजरा करण्यात आला होता. गणेश मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा देखील हटवण्यात आलेले आहेत. गणेश मंडपासाठी नोंदणी शुल्कात सवलत देखील देण्यात आलेली आहे. मंडपायसाठी खिडकी योजना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन दोन्हीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व मार्गावरील खड्डे बुजवण्यात येणार आहेत. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

  हेही वाचा : 

जे गेले ते शेवटपर्यंत गद्दार; बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरेंची टीका’

Latest Posts

Don't Miss